satish jarkiholi 
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनी घेतली शपथ

सकाळ वृत्तसेवा

मिलींद देसाई

बेळगाव : जनता दल ते काँग्रेस असा प्रवास करणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जारकीहोळी चर्चेत आले असुन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे ते वाहन देखील चर्चेत आले होते.

जारकीहोळी यांनी २०२० मध्ये एक चारचाकी वाहन खरेदी केले, त्या वाहनाचा क्रमांक केए ४९ एन २०२३ असा ठेवत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला सत्तेवर आणण्याचा निर्धार केला होता. त्याची फलश्रुती झाल्याचे दिसून आले आहे.

जारकीहोळी कुटुंबाचा बेळगाव जिल्ह्यात मोठा दबदबा असून १९९८ मध्ये सर्वप्रथम सतीश जारकीहोळी विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यावेळी ते जनता दलात होते. त्यानंतर 2008 मध्ये मतदार संघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यानी यमकणमर्डी मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली तेंव्हा पासून जारखीहोळी मोठ्या मताधिक्याने विजयी होत आहेत.

२०२३ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून नवे वाहन व २०२३ असा क्रमांक घेतल्याचे त्या वेळी जारकीहोळी यांनी जाहीर केले होते. शिवाय, स्वगृही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर न जाता सदाशिवनगर स्मशानभूमीतून त्यांनी या नव्या वाहनाचा वापर सुरू केला होता.

वाहन खरेदी केल्यानंतर ते आधी सदाशिवनगर स्मशानभूमीत नेले. तेथून त्या वाहनाचा वापर सतीश जारकीहोळी यांनी सुरू केला. त्यावेळी वाहन क्रमांकाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विचारणा केली होती. २०२३ मध्ये राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आणण्याचा संकल्प करून वाहन व क्रमांक घेतल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यांचा हा संकल्प पूर्ण झाला असून काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमत घेऊन सत्तेत आला आहे.

त्यामुळे जारकीहोळी यांचे ते वाहन पुन्हा चर्चेत आले होते. तसेच जारकीहोळी यांनी स्मशानभूमीत कार्यक्रम करून वाहनाचा वापर सुरू केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ व विरोधातही अनेकांनी वक्तव्ये केली होती. त्यामुळे जारकीहोळी यांचे ते वाहन राज्यभरात चर्चेचा विषय बनले होते. त्याच बरोबर महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१८ मध्ये राज्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले नाही. पण पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचा संकल्प राज्यातील प्रमुख नेत्यांनी केला होता. त्यात जारकीहोळी यांचाही समावेश होता. शिवाय २०१८ च्या निवडणुकीनंतर पक्षाने जारकीहोळी यांच्याकडे प्रदेश कार्याध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारीही दिली होती.

ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळत पक्षाला बेळगाव जिल्ह्यात मोठे यश मिळून दिले आहे. गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्‍वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची समाजात पेरणी करण्याचे काम जारकीहोळी यांच्याकडून केले जाते. यासाठीच त्यांनी बुद्ध, बसव, आंबेडकर घरोघरी अशी मोहीम २०२२ मध्ये हाती घेतली होती. शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT