Of Sayajirao Gaikwad Forget the Zilla Parishad 
पश्चिम महाराष्ट्र

सयाजीराव गायकवाड यांच्या पुण्यतिथीचा जिल्हा परिषदेला विसर 

सकाळ वृत्तसेवा

नगर : बडोदा संस्थानातील कर्तुत्वान संस्थानिक पुरोगामी विचारांचे कल्याणकारी श्रीमंतराजे सयाजीराव खंडेराव गायकवाड यांची आज पुण्यतिथी होती. याचा जिल्हा परिषद प्रशासनाला विसर पडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 
श्रीमंतराजे सजायीराव गायकवाड यांनी लोकल बोर्डाला स्वखर्चातून इमारत बांधून दिली होती. या इमारतीमुळेच नगरच्या वैभवात भर पडलेली आहे. गायकवाड यांनी लोकल बोर्ड अस्तित्वात असताना त्यासाठी सुसज्य अशी इमारत बांधून दिल्यामुळे या आवारात त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. दरवर्षीच पुण्यतिथी व जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे अभिवादन केले जात आहे. मात्र यंदाच्या वर्षी जिल्हा परिषद प्रशानाला त्याचा विसर पडला होता. 
गायकवाड यांनी स्वखर्चातून बांधून दिलेल्या इमारतीच्या नुतनीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सुमारे 40 लाखाचे अंदाजपत्रक करून ते बांधकाम विभागाकडे मंजुरीस पाठविलेले आहे. परंतु त्यांच्या पुण्यतिथीची विसर पडल्याने कर्मचाऱ्यांसह माजी जिल्हा परिषद सदस्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

लोकल बोर्डासाठी सयाजीराव गायकवाड यांनी योगदान मोठे दिलेले असून इमारत बांधून दिलेली आहे. या महात्म्यांचा पुण्यतिथीचा प्रशासनाला विसर पडणे ही खेदाची बाब आहे. याबाबत आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही बाब मांडणार असून संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. - राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्य. 

राज्य सरकारकडून कोणती जयंती व पुण्यतिथी साजरी कराययाची याचे निर्देश दिले जातात. त्याप्रमाणे प्रशासन त्या पुण्यतिथी व जयंती साजऱ्या करत आहे. 
-वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT