निपाणी (बेळगाव) : बेळगाव जिल्ह्यासह निपाणी, चिक्कोडी तालुक्यांतील नववी-बारावीपर्यंतच्या शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्कूलबस सुरु करण्यास काहीही हरकत नाही, मात्र त्यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, पालकांची संमती बंधनकारक असणार आहे. दुसरीकडे स्कूलबस सुरु करण्यापूर्वी संबंधित बसचालकाकडे वाहनाचा विमा आणि पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे.
निपाणी, चिक्कोडी तालुक्यांत 158 स्कूलबस आहेत. त्यांच्या माध्यमातून सुमारे 7 हजारांवर विद्यार्थ्यांची वाहतूक होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने स्कूलबस जागेवरच होत्या. 1 फेब्रुवारीपासून नववी - बारावीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या. तर लवकरच पाचवी-आठवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहेत. सार्वजनिक व खासगी वाहतूकही सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्कूलबसमधून विद्यार्थी वाहतुकीस परवानगी असेल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र बसचालकांकडे त्या वाहनाचा विमा (इन्शुरन्स), पीयूसी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
हेही वाचा - या वयात अण्णांना कशाला हवा असला उद्योग ? -
लॉकडाउनमुळे स्कूलबस बंद असल्याने त्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी स्कूलबस चालक संघटनेकडून केली आहे. मात्र त्यावर काहीच निर्णय न झाल्याने त्यांना विमा व पीयूसी काढावीच लागणार आहे. तत्पूर्वी, स्कूलबसमध्ये कोरोनासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन व्हायलाच हवे. पूर्ण क्षमतेने विद्यार्थी वाहतूक न करता एकूण क्षमतेच्या 50 टक्के विद्यार्थी वाहतुकीस परवानगी असेल, असेही प्रादेशिक वाहतूक खात्याने स्पष्ट केले आहे.
"लॉकडाउन काळात शाळा बंद असल्याने स्कूलबस जागेवरच उभ्या होत्या. त्यामुळे त्यावरील चालक, वाहक, सेविकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. त्या पार्श्वभूमीवर शासनाने स्कूलबस चालकांसाठी पासिंग व परमीट नूतनीकरणास मार्च 2021 पर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेतला. मार्चनंतर प्रत्येक स्कूलबसचे परमीट व पासिंग नूतनीकरण करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल."
- भीमगोंडा पाटील, निरीक्षक, प्रादेशिक वाहतूक कार्यालय, चिक्कोडी
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.