

Eknath Shinde
sakal
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय उलथापालथ होतानाही दिसत आहे. दरम्यान, मुंबईत महायुतीत शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा धक्का दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सख्ख्या भाच्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.