Paschim maharashtra sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : तिकीट काढून शाळेत; नाहक भुर्दंड, जलद वितरणाची मागणी

परिवहन मंडळाने बसपास वितरण प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांतून केली जात आहे.

सतिश जाधव

बेळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून बसपास वितरणाची प्रक्रिया बेळगाव परिवहन महामंडळाडून सुरु करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थी बसपासविनाच आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना तिकीट काढूनच शाळेला यावे लागत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत असून परिवहन मंडळाने बसपास वितरण प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांतून केली जात आहे.

कोरोनामुळे सुमारे दीड वर्षानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. राज्यात नववी ते बारावीच्या वर्गांना २३ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तसेच ६ सप्टेंबरपासून सहावी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. तर २५ ऑक्टोबरपासून पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांना सुरुवात झाली आहे. बेळगाव विभागात सुमारे दोन महिन्यांपासून बसपास वितरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही अनेक विद्यार्थी बसपासविनाच आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही बसपास मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी बसपास नसल्यामुळे शाळेला जाणे टाळले आहे.

बेळगाव परिवहन विभागात ७६ हजार बसपासधारक विद्यार्थी आहेत. सध्या सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना बसपास वितरित केले जात आहे. तसेच चार दिवसांपासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात असल्याने त्यांच्याकडून अर्ज मागविले जात आहेत. त्यांनाही लवकरच बसपासचे वितरण केले जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना बसपास तातडीने द्यावेत, अशी मागणी होत आहे.

बेळगाव परिवहन विभागाकडून बसपासचे तातडीने वितरण केले जात आहे. आतापर्यंत अर्ज आलेल्यांपैकी ९५ टक्के बसपास वितरीत केले आहेत. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

- के. के. लमाणी, परिवहन नियंत्रण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT