School collapses, then see what students do 
पश्चिम महाराष्ट्र

video : शाळा कोसळली, मग विद्यार्थ्यांनी काय केले पहा... 

सकाळ वृत्तसेवा

भाळवणीः रविवारी दुपारी प्राथमिक शाळा कोसळली. सुदैवाने सुट्टी असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. आज सकाळी पालकांनी शाळेत मोठी गर्दी करीत प्रशासनाला जाब विचारला. आमच्या लेकरांची शिक्षणाची चांगल्या इमारतीमध्ये सोय करा अन्यथा दाखले द्या अशी मागणी करीत संतप्त पालकांनी पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संतप्त पालकांच्या तीव्र रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले.

बाहेरची भरली शाळा 
भीतीने शिक्षकांनी वर्ग बाहेरच भरवले. वातावरणात दुपारपर्यंत धुके व थंडी असल्याने चिमुरडी कुडकुडत होती. त्याही स्थितीत त्यांचा शाळेसाठी जीव तुटत होता. एकेक करीत विद्यार्थी पुढे आले आणि शिक्षकांपुढे त्यांनी ओंजळ धरली... त्यावेळी शिक्षकांना आणि त्यांना भांडणाऱ्या पालकांनाही काही सूचेना. सगळेच निशब्द. 

पालकांनी अधिकारी आल्याशिवाय चर्चा नाही ही भूमिका घेतली. सकाळी गटविकास अधिकारी बाळासाहेब बुगे, विस्तारधिकारी जयश्री कार्ले, बांधकाम व कृषी समिती अध्यक्ष काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया झावरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके आदींनी शाळेला भेट दिली. 

पाठपुरावा करून उपयोग नाही 
गेल्या दहा वर्षापासून धोकादायक इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. संतप्त पालकांनी याबाबत अधिका-यांना प्रश्न विचारल्यावर ते निरूत्तर झाले. 

चौदाशे वर्ग खोल्या धोकादायक 
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले की, सुमारे चौदाशे शाळा वर्ग धोकादायक आहेत. त्या सर्व नव्याने बांधण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी दीडशे कोटी रूपये निधी हवा आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधी नाही. सध्या भाळवणी शाळेसाठी तातडीने चार खोल्यांसाठी निधी देऊन तातडीने काम सुरू करू. तोपर्यत विद्यार्थ्यांची पर्यायी इमारतीत व्यवस्था करण्यात येईल. आमदार नीलेश लंके यांच्या निधीतून दोन खोल्या बांधण्यात येणार आहेत. उर्वरित दोन खोल्या ग्रामस्थ लोकवर्गणीतून बांधणार आहे. 

चिमुरडीची मदत 
येथील प्राथमिक शाळेत पहिलीमध्ये शिकणारी तनिष्का अरूण रोहोकले या विद्यार्थीनीने शाळेत येताना बचत बॅंक घेऊन आली. माझी शाळा पडली तिच्या बांधकामासाठी माझे पैसे घ्या, असे म्हणत बचत बॅंक मुख्याध्यापक श्रीपती आबूज यांच्याकडे दिली. इतर विद्यार्थ्यांनीही तिचाच कित्ता गिरवला. 

यावेळी सरपंच लीलाबाई रोहोकले, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे,सेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले,गंगाराम रोहोकले,संभाजी आमले,अशोक रोहोकले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चेमटे,संदीप व्यवहारे,नंदकुमार चेमटे,अरूण रोहोकले आदीसह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT