School nutrition diet without packing date; Some grains are inferior 
पश्चिम महाराष्ट्र

शालेय पोषण आहार पॅकिंग तारखेशिवाय; काही धान्य निकृष्ट

दिलीप क्षीरसागर

कामेरी (जि. सांगली) ः शासनाच्यावतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून वाटप करण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजन आहारातील मूगडाळ व हरभरा पॅकिंगवर तारीख नाही. हा आहार पॅकिंग केल्यापासून तीन महिने व सहा महिने उपयोगात आणावा असे नमूद केले आहे. शासनच पॅकिंगची तारीख देत नसेल इतरांचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना लागू आहे. योजने अंतर्गत शाळेतील शालेय पोषण आहार शिजवून दिला जात असे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्याने पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. वाटपासाठी येणाऱ्या धान्याचा करार शासन व ठेकेदारात शासनस्तरावर झालेला असतो.

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धान्य वाटपासाठी दिले जाते. तपासणीसाठी प्रयोगाळेकडे पाठवले जाते. शाळांना वाटपाबाबत सूचित केले जाते. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. धान्य शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना द्यावे, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. त्यानुसार शाळा पालकांना बोलावतात. पहिली ते पाचवीसाठी 600 ग्रॅम मुगडाळ, 1200 ग्रॅम हरभरा, तांदूळ 3 किलो 400 ग्रॅम, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 900 ग्रॅम मूगडाळ, 1800 ग्रॅम हरभरा डाळ व तांदूळ पाच किलो 100 ग्रॅम याप्रमाणे वाटपाचे नियोजन आहे.

या आहारात मिळणाऱ्या मूगडाळ, हरभराडाळ यातील काही पिशव्यात धान्य निकृष्ट आहे. त्याचबरोबर तर धान्याच्या पॅक पिशवीवर पॅकिंग केल्यापासून मूगडाळ तीन, हरभराडाळ सहा महिन्यात वापरावी, असे नमूद केले आहे. मात्र शासनाने पॅकिंगवर तारीख टाकलेली नाही. अशा पिशव्या वाटल्यास कशा ? असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. 

तक्रारी शिक्षण संचालक (पुणे) यांच्याकडे

शासन स्ततरावर धान्यपुरवट्याचा करार झालेला असतो. एजन्सीमार्फत येणारे धान्य प्रयोगशाळेकडे पाठवले जाते. करारानुसारच्या त्रुटी व शाळांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कारवाईचा अधिकार जिल्हास्तरावर नाही. तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शिक्षण संचालक (पुणे) यांच्याकडे पुढील कार्यवाईसाठी सादर केल्या आहे.

- सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. सांगली

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT