school 
पश्चिम महाराष्ट्र

सांग, सांग भोलानाथ, शाळा भरेल काय? 

सकाळवृत्तसेवा

सांगली - येत्या 15 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचारविनिमय करत आहे. त्यासाठी आवश्‍यक माहिती जिल्ह्यातूनही मागवण्यात आली आहे. शाळा भरवताना आव्हाने मोठी असणार आहेत. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती असा समन्वय महत्वाचा असणार आहे. शाळा भरवताना काही नवे पॅटर्न समोर येण्याची शक्‍यता आहे. त्याच्या आदेशाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. 
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जूनमध्ये शाळा सुरु करण्याबाबत सकारात्मक पावले उचलायला सुरवात केली आहे. कोरोनासोबत जगावे लागेल, असा विचार घेऊनच जगभर काम सुरु झाले आहे. आता त्यात शाळाही सुरु केल्या जातील. त्या कशा सुरु कराव्यात, याबाबत काही कल्पना समोर आल्या आहेत. त्यात एक आड एक दिवस मुलांना शाळेत बोलवावे का? सकाळ सत्रात सात ते बारा आणि दुपार सत्रात बारा ते पाच अशी शाळा भरवावी का? अशा दोन पर्यायांवर प्राधान्याने चर्चा केली जात आहे. सुरक्षित अंतर ठेवून मुले बसतील आणि गोंधळ होणार नाही, अशी व्यवस्था होईल याची खात्री झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. 

700 वर्गखोल्या 

सांगली जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी 700 खोल्या वापरात घेण्यात आल्या आहेत. तेथे संस्थात्मक क्वारंटाईन सोय करण्यात आली आहे. ती किती काळासाठी असेल, याची या घडीला कुणालाच माहिती नाही. त्यामुळे या शाळा सुरु होतील का, याबाबत शंका आहेत. 

एक सापडला तर 
शाळा बंद होईल 

शाळेत एक विद्यार्थी किंवा शिक्षक पॉझिटिव्ह सापडला तर संबंध शाळा क्वारंटाईन करावी लागेल. ती पुढील 14 दिवस बंदच राहील, शिवाय विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण होईल, याची चिंता आहे. या कारणास्तव शाळा सुरु करताना शंभर टक्के दक्षता घेण्याबाबत सरकार विचार करत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT