pune.jpg
pune.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

स्कॉर्पिओची बैलगाडीला धडक; एक व्यक्तीसह बैलाचा मृत्यू

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी ( जि सोलापूर) : ऊसतोड करण्यासाठी चाललेल्या बैलगाड्यांना ने स्कॉर्पिओने मागून जोरात धडक दिली.या अपघातात एक 30 वर्षीय उसतोड कामगार व 1 बैल ठार झाले तर 1 ऊसतोड कामगार महिला व 2 बैल जखमी झाले आहेत. ही घटना कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील पापनस गावाजवळ आज पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मण रामकीसन होगले ( वय 30 रा पाचवड ता परांडा जिल्हा उस्मानाबाद) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.  पहाटेच्या  सुमारास चार बैलगाड्या रिधोरे गावाच्या दिशेने ऊसतोड करण्यासाठी निघाल्या होत्या. मागील बैलगाडीमध्ये लक्ष्मण होगले होते. त्या पुढील गाडीमध्ये प्रयागाबाई किसन उघडे ( वय 40 रा पाचवड ता परांडा) व त्यांचा मुलगा मुकेश उघडे हे दोघे होते.

पहाटेच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने( स्कॉर्पिओ) सर्वात मागील बैलगाडीस धडक दिली. त्यामुळे ती बैलगाडी पुढच्या बैलगाडीला धडकली. या अपघातामध्ये लक्ष्मण होगले व गाडीचा बैल ठार झाले. प्रयागाबाई उघडे या जखमी झाल्या असून त्यांच्यावर बार्शी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. धडक एवढी जोरात होती की, मागील बैलगाडी पुढील बैलगाडीला अशा चार बैलगाड्या पुढे धडकल्या व  धडक बसल्यानंतर बैलगाडीतील लोक उडून बाहेर पडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT