जनावरांत पसरतोय लाळ खुरकुत!  sakal
पश्चिम महाराष्ट्र

दुभत्या जनावरांत पसरतोय लाळ खुरकुत!

आजार संसर्गजन्य : तालुक्यातील गो-पालक चिंताग्रस्त

- राजेंद्र हजारे

निपाणी : लाळ खुरकुत आजाराने दुभती जनावरे आजारी असल्याने त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर होत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने निपाणी तालुक्यातील गो-पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

प्रतिकारशक्ती कमी असलेल्या जनावरांना लाळ खुरकुत आजाराची लागण होते. पायात त्राण नसल्याने त्रास होऊन चालताना लंगडावे लागते. तोंड आल्यामुळे चारा, वैरण खाता येत नाही. यात अनेक खासगी उपचारही गो-पालक करत आहेत. निपाणी तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांची जनावरे या आजाराने त्रस्त आहेत. दुभत्या जनावरांच्या दुधावर परिणाम होत असल्याने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत असल्याचे चित्र दिसत आहे.

लसीकरण महत्त्वाचे

लस देण्यात न आलेल्या जनावरांचा आजार बळावत आहे. निपाणी तालुक्यात अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. हा आजार टाळण्यासाठी त्वरित जनावरांना लसीकरण करावे, अशी मागणी गो-पालपाकातून होत आहे.

'लाळ खुरकुत हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे दुसऱ्या जनावरांना त्याची बाधा होऊ न देण्यासाठी खबरदारी घ्यावी. औषधोपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये.'

-डाॅ. जे. ए. कंकणवाडे,

तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, निपाणी

अशी घ्या खबरदारी...

  • लाळ खुरकुत हा संसर्गजन्य आजार आहे.

  • त्या जनावरांना इतर जनावरांपासून दूर ठेवावे.

  • पशुवैद्यकांकडून औषधोपचार करून घ्यावा.

  • कोथिंबीर खाऊ घाला, लाळ खुरकत कमी होते.

  • बडीशेपेचे पाणी पाजावे.

  • जखम भरण्यासाठी त्या स्वच्छ करून औषधोपचार करावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT