Sculptors are empty as there is no order from Ganeshotsav Mandal 
पश्चिम महाराष्ट्र

...म्हणून मूर्तिकारांचे हात रिकामेच 

सकाळवृत्तसेवा

बेळगाव: गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यावर आला आहे. मात्र गणेशोत्सव मंडळांकडून अद्याप ऑर्डर नसल्याने मूर्तिकारांचे हात रिकामेच आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. सध्या लॉकडाउन शिथील केल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, अद्यापही मूर्तिकारांना सार्वजनिक मंडळांच्या "श्री'मूर्तींच्या ऑर्डर्सची प्रतीक्षा आहे. 

यंदा 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर याकाळात गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवाला तीन-चार महिने शिल्लक असतानाच गणेशोत्सव मंडळांकडून मूर्तिकारांना ऑर्डर येत असतात. परंतु, यंदा उत्सव तीन महिन्यावर येऊन ठेपलेला असतानाही मूर्तिकारांना ऑर्डर मिळालेल्या नाहीत. बेळगाव शहर व परिसरात सव्वाशे ते दीडशे मूर्तिकार आहेत. काहीजण मोठ्या मूर्ती तर काहीजण लहान-मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती बनवित असतात. लहान मूर्ती बनविण्याच्या कामाला 8 ते 10 महिने अगोदर, तर मोठ्या मूर्ती 3 ते साडेतीन महिने अगोदर बनवायला सुरुवात होते. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे मूर्तिकारांना नुकसान सोसावे लागले. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउन जाहीर केल्याने नुकसान सोसावे लागणार असल्याची खंत मूर्तीकार विशाल गोदे यांनी व्यक्त केली. 

सरकारकडून मूर्तिकारांना कोणतीही मदत मिळत नाही. देवाची सेवा, आपली कला समाजासमोर प्रकट करण्याच्या भावनेतून जमेल तितक्‍या कालावधीत मूर्ती बनवत असल्याचेही श्री. गोदे म्हणाले. दरम्यान, यंदा लॉकडाउनमुळे अनेक समस्या उद्‌भवल्या असून कोरोना कधीपर्यंत आटोक्‍यात येईल, याची खात्री नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यासाठी मूर्तिकारांना मंडळांच्या ऑर्डर्सची प्रतीक्षा आहे. 

 कच्चा माल उपलब्ध नाही

उत्सवाला केवळ तीन महिने शिल्लक असूनही लॉकडाऊनमुळे मूर्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे मूर्तिकारांनी अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही. काही मंडळांनी दिलेल्या ऑर्डरही नाईलाजास्तव रद्द कराव्या लागल्या असल्याचे मूर्तिकार विश्वनाथ जे. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT