पश्चिम महाराष्ट्र

कोरोना ड्युटीसाठी अधिकारी, कर्मचारयांचा शोध

निपाणीत प्रशासन कामाला : शिक्षकांच्या जागी अन्य खात्याच्या कर्मचारयांच्या नेमणूका

अमोल नागराळे

निपाणी : कोरोनाच्या कामकाजासाठी निपाणी तालुक्यातून नेमलेल्या सुमारे तीनशे शिक्षकांना या ड्युटीमधून मुक्त करण्यात आले होते. आता पुन्हा तिसरया लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महाराष्ट्राच्या सीमेवर आरटीपीसीआर तपासणीचे आदेश दिले आहेत. परिणामी तालुका प्रशासनाला कोरोना ड्युटीसाठी पुन्हा अधिकारी, कर्मचारी नेमावे लागत आहे. मात्र सध्या शाळा सुरु असल्याने शिक्षकांना ड्युटी न देता तालुका व तालुक्याबाहेरील अन्य खात्याच्या अधिकारी, कर्मचारयांना ड्युटीवर नेमले जात आहे.

निपाणी हा राष्ट्रीय महामार्गालगत महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुका असल्याने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथे शासन, प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाते. अशातच महाराष्ट्राची हद्द संपल्यावर कर्नाटकातील प्रवेशाच्या ठिकाणी म्हणजे कोगनोळी राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका असल्याने येथे कोरोना काळात नियमाचा भंग होऊ नये, यासाठी कर्नाटक शासनाचे विशेष लक्ष होते. त्यामुळे शिक्षकांसह विविध खात्याचे अधिकारी, कर्मचाऱयांच्या कोविड ड्युटीसाठी नियुक्त केले होते.

काही दिवसापूर्वी संसर्ग घटल्याने कोगनोळी नाक्यावरील अधिकारी, कर्मचारयांना कोविड ड्युटी मुक्त करण्यात आले होते. मात्र आता विविध ठिकाणी पुन्हा कोरोना संसर्ग रुग्ण आढळून आल्याने आणि नव्या ओमीक्राॅन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पुन्हा कोगनोळी तपासणी नाक्यावर आरटीपीसीआऱ तपासणीसह अन्य नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रारंभी महाराष्ट्रातून कर्नाटकात कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी प्रशासनाने शिक्षकांना ड्युटीवर घातले होते. आता शाळा सुरु असल्याने कोरोना ड्युटीसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

परिणामी निपाणीशिवाय चिक्कोडी, रायबागसह अन्य तालुक्यातील इतर खात्याच्या अधिकारी, कर्मचारयांचा शोध तालुका प्रशासन घेत आहे. सध्या निपाणी भागात महाराष्ट्राच्या सीमेवर पाच ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. तेथे महसूल, आरोग्य, पोलिस खात्याचे अधिकारी, कर्मचारयांचे पथक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तीन शिफ्टमध्ये अधिकारी, कर्मचारयांना ड्युटी दिली जाणार आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी आर. व्यकंटेशकुमार यांनी तातडीने नाक्यावर अधिकारी, कर्मचारयांची नियुक्ती करून आरटीपीसीआऱसह अन्य नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे तालुका प्रशासन पुन्हा करोना ड्युटी कामात व्यस्त होत आहे. तलाठी, पंचायत विकास अधिकारी, आशा कार्यकर्त्या यांच्यासह सर्व खात्याच्या कर्मचारयांची प्रशासन ड्युटीसाठी चाचपणी करीत आहे.

संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुन्हा कोरोना ड्युटीसाठी अधिकारी, कर्मचारयांची नियुक्ती केली जात आहे. शाळा सुरु असल्याने कोरोना ड्युटी मुक्त शिक्षकांना ड्युटी देता येणे अवघड आहे. सध्या अन्य तालुक्यातील इतर खात्याचे अधिकारी, कर्मचारयांना ड्युटी देण्याचे काम सुरु आहे. लवकरच आॅर्डर दिली जाईल.

-डाॅ. मोहन भस्मे,

तहसीलदार, निपाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT