corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

धोका वाढला : शिराळा तालुक्‍यात कोरोनाचा दुसरा बळी...आणखी 14 रूग्ण सापडले 

सकाळवृत्तसेवा

शिराळा (सांगली)- मणदूर (ता.शिराळा) येथे 8 पुरुष व 5 महिला अशा 13 जणांचा आणि काळोखेवाडी 20 वर्षीय युवक अशा एकूण 14 जणांचा "कोरोना' अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. त्या पैकी 80 वर्षीय कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्‍यातील "कोरोना' चा दुसरा बळी गेला आहे. शिराळा पश्‍चिम भागात एकूण 32 रुग्ण सापडल्याने हा विभाग कोरोनाचा "हॉट स्पॉट' बनला आहे. 

मणदूर येथे कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. या शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील बहुतांशी लोक हे मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने अनेकांनी गावची वाट धरली. त्या माध्यमातून तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मणदूर मध्ये आत्ता पर्यंत 19 रुग्ण सापडले आहेत. मणदूर येथील वृद्धास शुक्रवारी त्रास जाणवू लागल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. इतर सात पुरुष व पाच महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. काळोखेवाडी येथील महिलेपाठोपाठ तिच्या संपर्कातील 28 वर्षाच्या तरूणास कोरोनाची लागण झाली आहे. मणदूर येथील 21 वर्षाचा युवक "कोरोना' मुक्त झाला आहे. 
या पूर्वी मोहरे येथील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ मणदूर येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. खिरवडे व मणदूर येथील दोन रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 
तालुक्‍यात निगडी-4, रेड-3, अंत्री खुर्द-1, मोहरे-2, खिरवडे-2, करुंगली-1, चिंचोली-1, मणदूर-19, काळोखेवाडी-2, रिळे- 4,माळेवाडी-1 असे एकूण 40 रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तर निगडी-3, रेड-3, चिंचोली-1, करुंगली-1, मोहरे-1, मणदूर- 1 असे 10 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT