Second theater is soon: Satej Patil 
पश्चिम महाराष्ट्र

दुसरे नाट्यगृह लवकरच : सतेज पाटील

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासाठी लवकरच दोन ते अडीच हजार क्षमतेचे दुसरे नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आयटी पार्क परिसरातील जागेचा विचार सुरू आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण अतिशय चांगल्या पध्दतीने झाले असून अभिनेता सुबोध भावे यांनी काल रात्रीच याबाबतचे ट्विट केले आहे. येथील उर्वरित कामांसाठीही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. "शहराला हवे दुसरे नाट्यगृह' या मथळ्याखाली आज "सकाळ'ने या विषयावर मंडे स्पेशल रिपोर्ट प्रसिध्द केला होता. 

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाचे मूळ स्वरूप कायम ठेवून नूतनीकरण व संवर्धनाचा पहिला टप्प्पा आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाला. दुसरा टप्पा अजूनही निधीच्या प्रतीक्षेत आहे. नाट्यगृहाचे सध्याचे काम पाहता ते अत्यंत देखणे आणि सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेच झाले आहे. फक्त रंगमंचाचा विचार केला तरी त्याची योग्य जपणूक केली, तर किमान शंभर वर्षे त्याला काही होणार नाही, एवढी खात्री देण्यात आली आहे. साऊंड आणि लाईट सिस्टीम्स या सध्याच्या सर्वांत अद्ययावत सिस्टीम्स असून, त्यांची किंमत सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांच्या घरात आहे. मात्र, ही सारी यंत्रणा अगदी व्यवस्थितपणे सांभाळण्यासाठी तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची (उदा. साऊंड ऑपरेटर, स्टेज असिस्टंट, गार्डनर, हेल्पर) भरती करणे अजूनही महापालिकेला शक्‍य नसल्यामुळेच काही दिवस अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबतही आता महापालिका स्तरावर योग्य उपाययोजना वेगाने केल्या जाणार आहेत. 

गतीन उपाययोजना करणार : आयुक्त डॉ, कलशेट्टी 
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील तांत्रिक अडचणीं आणि आवश्‍यक मनुष्यबळाबाबत अहवाल तयार असून अधिक गतीने त्याबाबतच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT