PAKSHI
PAKSHI 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात पक्षी निरीक्षणात काय नोंदी आहेत पहा

गजेंद्र पोळ

चिखलठाण (सोलापूर) : पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना वामनराव बदे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात परिसरात 57 पक्ष्यांची नोंद केली. गेल्या सहा वर्षांपासून योजना राबविली जात आहे. योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरणातील विविध घटकांबाबत सजग व संवेदनशील बनवून पर्यावरण संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच भाग म्हणून योजनेंतर्गत पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. आपल्या परिसरात असणारे पक्षी व त्यांचे महत्त्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी समजावून घेतले. 

हेही वाचा- सोलापूरच्या नगरसेवकांना ‘या’ समितीचे दरवाजे यंदाही बंद
विद्यार्थ्यांकडुन 57 प्रकारच्या नोंदी 

पक्षी निरीक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांनी दोन किमीचे अंतर निश्‍चित करून पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी केल्या. या निरीक्षणात विद्यार्थ्यांनी 57 प्रकारच्या स्थानिक व विदेशी पक्ष्यांची नोंद केली. यामध्ये हळद्या, शिंपी, नाचरा, लालबुड्या बुलबुल, वेडा राघू याचबरोबर स्थलांतरित भोरडी, राखी बगळा, मोठा बगळा, चिकना कुदळ्या, पांढरा शराटी, नदी सुरय, हिवाळी सुरय, थापट्या बदक, राखी बदक, काळटोप कुरव अशा पक्ष्यांची नोंद विद्यार्थ्यांनी केली. यावेळेस चार ते साडेचार हजार किमीचा प्रवास करून आलेला पिवळा परीट व दोन हजार किमीचा प्रवास करून आलेला पांढरा परीट या पक्ष्याची नोंद विद्यार्थ्यांनी केली. या वेळेस योजनेंतर्गत उच्च प्रतीच्या दुर्बिणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ऑस्प्रे या शिकारी पक्ष्याची नोंद प्रथमच उमरड परिसरात करण्यात आली. हा पक्षी हिवाळ्यात स्थलांतरित करणारा पक्षी आहे. आपल्याकडे हा पक्षी अभावानेच दिसतो. हा एक विश्‍वव्यापी पक्षी असून याचे प्रजनन युरोपमधील भौगोलिक परिस्थितीत होते. मासे हे त्याचे आवडते खाद्य आहे. 

हेही वाचा- ‘बी ई’च्या विद्यार्थ्याचा शिपाई पदासाठी अर्ज
यांनी केले मार्गदशर्न

हा उपक्रम पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक गणेश सातव यांच्या मार्गदर्शनखाली राबविण्यात आला. यात गणेश सातव यांनी माणसांच्या सहवासात राहणारे पक्षी, शेती शिवारात आढळणारे पक्षी, गवताळ कुरणात व पाणथळ जागेत आढळणाऱ्या पक्ष्यांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी करण्याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात बदे विद्यालयातील इयत्ता आठवीचे विद्यार्थी, योजना प्रमुख संपत मारकड, महेश बदे व महावीर जगताप यांनी सक्रिय सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक संपत कोठावळे, सहशिक्षकांचे उपक्रमास सहकार्य मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवलं जीवन; जळगावच्या जामनेर येथील घटना

Fact Check: मुंबईतील भाजपच्या निवडणूक किटमध्ये 'गोल्ड बिस्किटे' नव्हती; खोट्या दाव्यासह फोटो अन् व्हिडिओ व्हायरल

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

Latest Marathi News Live Update : न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक आणि त्यानंतरची कोठडी अवैध - सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT