seize the dead animals under of police protection in belgum marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

कडक पोलिस बंदोबस्त पण भलत्याच कारणासाठी...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेने पोलिस बंदोबस्तात पुन्हा सुरू केली आहे. सोमवारी (ता.२३) पोलिस लाईन येथे जनावरे पकडताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर हल्ला झाला होता. त्यामुळे पथकाने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम बंद ठेवली होती.

पोलिस बंदोबस्तात पकडली जनावरे

हल्ल्याची घटना घडल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले होते. पण, महापालिका आयुक्त किंवा आरोग्याधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली नाही. या घटनेबाबत कॅंप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविणे आवश्‍यक होते, पण आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी पोलिसांत तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. शिवाय यापुढे पोलिस बंदोबस्तातच मोहीम राबविण्याचा आदेशही दिला. आरोग्याधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे पथकाचे मानसिक खच्चीकरण झाले असून पथकाने तीन दिवस मोहीम थांबविली. पण शहरात मोकाट जनावरांची संख्या व त्यामुळे समस्या वाढल्यामुळे पुन्हा मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सावधानता

शुक्रवारी (ता. २७) अतिक्रमण निर्मूलन पथकाने खडेबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबविली. त्यासाठी खडेबाजार ठाण्याकडून पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला. 
सकाळच्या टप्प्यातच ही मोहीम राबविण्यात आली असून चार मोकाट जनावरे पकडण्यात आली. खडेबाजार येथील शीतल हॉटेल परिसर, नरगुंदकर भावे चौक व शेरी गल्ली या ठिकाणी पथकाने मोहीम राबविली. पकडलेली जनावरे केके कोप्प येथील गोशाळेत सोडली जातात. जनावरे गोशाळेकडे नेताना जनावरांच्या मालकांकडून पाठलाग होतो. अनेकदा त्यांच्याकडून हल्लाही केला जातो. त्यामुळे गोशाळेपर्यंत पोलिस अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत होते. त्यामुळे शुक्रवारची मोहीम यशस्वी पार पडली. महापालिकेकडून गेल्या दोन महिन्यांपासून नियमितपणे ही मोहीम राबविली जात आहे. तरीही शहरातील मोकाट जनावरांची संख्या कमी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

IND vs WI 1st ODI : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, आता विराट कोहली म्हणतो, माझं लक्ष...

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

SCROLL FOR NEXT