veicle reliese 
पश्चिम महाराष्ट्र

जप्त वाहनांची सुटका! 'या' नियमांचे पालन केल्याशिवाय मिळणार नाही वाहन

तात्या लांडगे

सोलापूर : जप्त केलेले वाहन घेऊन जाण्यापूर्वी वाहनचालकांना त्या वाहनावरील पूर्वीचा संपूर्ण दंड भरावा लागणार आहे. पूर्वीचा दंड नसल्यास त्या वाहनचालकाला 250 रुपये रोखीने द्यावे लागणार असून ते त्यांनी सुट्टी घेऊन यावेत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी केले आहे. उद्यापासून (मंगळवारी) जप्त केलेली पोलीस मुख्यालयातील 300 तर नॉर्थकोट मैदानावरील 300 वाहने दररोज टप्प्याटप्प्याने सोडली जाणार आहेत. त्याची यादी सोशल मिडियावर व्हायरल केली जाईल, असेही ते म्हणाले.


सोलापूर शहरातील तीन हजार 601 दुचाकी तर 194 रिक्षा आणि 97 चारचाकी वाहने पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केली आहेत. मागील दीड ते दोन महिन्यांपासून ही वाहने एकाच ठिकाणी आहेत. वाहनांची देखभाल व दुरुस्ती ही झालेली नाही तर दुसरीकडे वाहनांच्या चाव्याही गहाळ झाल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी येताना त्यांच्याकडील डुप्लिकेट चावी घेऊन यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच संबंधित वाहनचालकाने येताना तोंडाला मास्क अथवा रूमाल लावलेला असावा आणि त्याच्याकडे सॅनिटायझर असावे, असाही निकष लावण्यात आल्याचे भालचीम यांनी स्पष्ट केले.

वाहन चालकांनी येताना 'हे' लक्षात ठेवावे

केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविला आहे. 3 जूनपासून लॉकडाउन अंशत: शिथिल केला जाणार आहे. तत्पूर्वी,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वाहन घेऊन वस्तू खरेदीसाठी जावू नये, असे वारंवार आवाहन करुनही वाहन घेऊन बाहेर पडणारी वाहने पोलिसांनी जप्त केली. आता जप्त केलेली वाहने उद्यापासून (मंगळवारी) सोडून दिली जाणार आहेत. मात्र, संबंधित वाहन मालकाने वाहन सोडवून नेताना दंडाची रक्कम भरण्यासाठी सुट्टे पैसे आणावेत. तसेच दररोज पोलीस मुख्यालयातील 300 तर नॉर्थकोट मैदानावरील 300 वाहने सोडली जाणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 7 या वेळेत ही वाहने सोडली जातील. दररोज सोडण्यात येणाऱ्या वाहनांची यादी सोशल मीडियावर व्हायरल केली जाईल, त्याकडे वाहनचालकांनी लक्ष ठेवावे.

- बाळासाहेब भालचीम, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा


15 लाखांहून अधिक जमा होणार दंड

लॉकडाउन काळात ठिकठिकाणी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तीन हजार 601 दुचाकी, 194 रिक्षा, 97 चारचाकी वाहने जप्त केली आहेत. वाहन चालकांकडे कागदपत्रे नसल्यास वेगळा दंड आणि त्याचवेळी पूर्वीचा दंडही भरावा लागणार आहे. असून 15 लाखांपर्यंत दंड जमा होणार आहे तर दुसरीकडे काही वाहनचालकांचे परवानेही रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओ कार्यालयाला पाठवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT