Senior singer Bharati Vaishampayan dies 
पश्चिम महाराष्ट्र

ज्येष्ठ गायिका भारती वैशंपायन यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ज्येष्ठ शास्त्रिय गायिका आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमूख डॉ.भारती वैशंपायन यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 66 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पती अविनाश वैशंपायन, मुलगा केदार, मुली मीरा आणि मधुरा, सून शितल, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भारती वैशंपायन यांच्या रुपाने चांगल्या गायिका आणि शास्त्रिय संगीताच्या गाढ्या अभ्यासक हरपल्याची भावना कला क्षेत्रातून व्यक्त झाली. 

डॉ.भारती वैशंपायन यांचा जन्म 1जानेवारी 1954 साली झाला. त्यांनी चिंतूबुवा म्हैसकर, पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.त्यांनी बाबूराव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठुमरी व दादरा यांचे उपशास्त्रीय संगीत आत्मसात केले. वैशंपायन यांनी एस.एन.डी.टी. मधून संगीतामध्ये एम.ए. केले. 1985 साली गंधर्व महाविद्यलयाने त्यांना डॉक्‍टरेट ने सन्मानित केले. जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून त्यांनी अनेक शहरांमध्ये असंख्य मैफिली केल्या. आकाशवाणीसाठी (ऑल इंडिया रेडिओ) 1972 पासून त्या कार्यक्रम करत होत्या. टॉप ग्रेड कलाकार आणि लाईट-क्‍लासिकल श्रेणीतील "ए' ग्रेड म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. हिंदुस्थानी रागावर त्यांचा अभ्यास होता. दुर्मिळ आणि प्राचिन रागांवर त्यांनी संगीत मैफली सादर करून या रागांचे संवर्धन केले. डॉ. भारती वैशंपायन यांनी मराठी संगीत नाटकच्या परंपरेत सक्रिय सहभाग घेतला आहे. या क्षेत्रात त्यांनी संगीत शारदा, संगीत मानापमान, संगीत स्वयंवर यांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शीत केलेल्या संगीत स्वयंवरने दिल्ली येथील ब्रुहनमहाराष्ट्र शैक्षणिक संस्था येथे सर्वोत्कृष्ट नाटकसाठी प्रथम क्रमांक पटकाविला. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईतर्फे त्यांना गानहिरा ही पदवी मिळाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमूख म्हणूनही त्यांना काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 13 विद्यार्थ्यांनी संगीत विषयात संशोधन करून डॉक्‍टरेट मिळवली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GSAT-7R Satellite: भारतीय सैन्याची अंतराळात नवी ताकद! इस्रोकडून सर्वात प्रगत उपग्रह बाहुबली प्रक्षेपित; वैशिष्ट्य काय?

Baba Vanga Prediction : येत्या 60 दिवसांत 4 राशी होणार मालामाल ! बाबा वांगाची भविष्यवाणी उघड

MPSC Success Story: 'राजेश इंदोरे एमपीएससीच्या वर्ग एक परीक्षेत राज्यात ४३ वा': आईच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू, कष्टाच्या जाेरावर यशाल गवसणी

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

SCROLL FOR NEXT