Aditi-Sarangdhar
Aditi-Sarangdhar 
पश्चिम महाराष्ट्र

मालिकांना आव्हान ठरतील वेब मालिका

सकाळवृत्तसेवा

सातारा - मोठा प्रेक्षक वर्ग मिळणाऱ्या वेब सिरीज येत आहेत. लोकांना दूरचित्रवाणी संचापुढे बसायला वेळ नाही. अँड्रॉईड मोबाईलमुळे कोठेही सहज वेब मालिका पाहता येते. त्याला व्ह्यूवर्स ही चांगले मिळत आहेत. आगामी काळत वेब मालिका या मूळ प्रवाहातील दूरचित्रवाणी मालिकांपुढे आव्हान असतील, असे मत आभाळमाया-वादळवाट फेम अभिनेत्री अदिती सारंगधर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

अभिनेत्री सारंगधर या येथे नुकत्याच आल्या होत्या. त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी चित्रपट, रंगभूमी, दूरदर्शन मालिका आणि अभिनेत्री, गृहिणी म्हणून जीवन जगतानाचे अनुभव अशा विविध विषयांवर संपादकीय सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. 

सध्या ‘ह. म. बने तु. म. बने’ या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘लोकांना आता सासू-सुनेच्या भांडणांचा कंटाळा आला आहे. रसिकांना आता हलके फुलके विनोद आणि मनोरंजन हवे आहे.

कॉलेजमध्ये असताना रंगभूमीवरील अभिनयाने या प्रवासाला सुरवात केली. अनेक नाटकांचे प्रयोग सादर केले. मुलींच्या ‘ऑल दी बेस्ट’चे ३५० प्रयोग झाले. त्यानंतर ‘दामिनी’ मालिका केली. सध्याही सिरिअलमध्ये व्यस्त आहे. त्यावरच सध्यातरी लक्ष केंद्रित केले आहे. रंगभूमी, दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपट ही मनोरंजनाची तिन्ही माध्यमे मला सशक्त वाटतात. आता त्यातील अभिनय करण्याच्या पद्धतीत फारसा फरक राहिलेला नाही. नाटकांतही तंत्रज्ञान सुधारल्याने आता नैसर्गिक अभिनय होतो. मात्र, प्रत्येक ठिकाणी अभिनय चांगला होण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते.’’ 

वाचनाची खूप आवड आहे. तसेच भटकंतीही खूप करते. रोजचे १२-१२ तासांचे शूटिंगचे शेड्युल्ड असले तरी मी माझ्या मुलाला आणि कुटुंबाला भरपूर वेळ देते. शिवाय व्यायामालाही मी वेळ काढते. मी चांगली गृहिणी आहे. मी जेवण चांगले करते. मी पत्नी आहे, तशीच आईही आहे. मुलांना आणि कुटुंबाला पुरेसा वेळ देणे हे माझे कर्तव्य समजते. लोकांना आता ताणतणाव नको आहेत. त्यामुळेच विनोदी, हलक्‍या फुलक्‍या मालिका त्यांना आवडतात, असेही सारंगधर म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT