Service Road Bad in Sangli City 
पश्चिम महाराष्ट्र

सेवा रस्त्याची पुरती वाताहत

विश्रामबाग-कर्मवीर चौकातील स्थिती; परिसरात नेत्यांची घरे, कार्यालये

सकाळ वृत्तसेवा

सांगली - महापौरांच्या घरापासून हाकेचे अंतर. आमदारांच्या कार्यालयापासून ५० मीटर. काँग्रेस प्रमुख नेत्यांच्या घरापासून ५० मीटर. माजी पालकमंत्र्यांच्या कार्यालयापासून ५० मीटर. विश्रामबाग ते कर्मवीर चौक सेवा रस्ता. हे असे अंतर सांगण्याचे कारण म्हणजे या रस्त्याची अवस्था या मंडळींना रोज दिसते. ही मंडळी बहुधा रोज त्याकडे पाहत जातात, तरीही त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. अत्यंत वाईट स्थितीत असलेला हा रस्ता सांगलीची अब्रू वेशीवर टांगत आहे.

कुणाही सांगलीकराने या रस्त्यावरून एकवेळ प्रवास करावा आणि त्याच्या तोंडून महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘उद्धार’ झाला नाही, तर सांगाल ते, अशी पैज लावण्यासारखी परिस्थिती. खड्डे मोजायला गेलात, तर एकूण रस्त्याच्या अंतरापेक्षा खड्ड्यांचा आकार अधिक होईल. त्यात साचलेले पाणी, त्याची झालेली दलदल, वाहने जाताना पाणी उडल्याने होणारी पंचाईत... इकडे आपण का आलो, असा प्रश्‍न पडतोच पडतो.

जिल्हा बँकेपासून या रस्त्याची कर्मकहाणी सुरू होते, ती थेट हॉटेल पै प्रकाशच्या दारात जाऊन थांबते. या बहुतेक प्रवासात फक्त हॉटेल ग्रेट मराठासमोरचा २०० फुटाचा पट्टा सोडला तर खड्डा नाही, असा भाग दाखवा, असे खुले आव्हान सामान्य नागरिक देऊ शकतो.

सांगली ते मिरज रस्ता चौपदरी झाला आहे. तो सहापदरी करण्याचे स्वप्न पहिले जात आहे. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच होण्याची चिन्हे आहेत. अर्थात, ही दंतकथा वाटण्याआधी तो मंजूर व्हावा, अशी अपेक्षा आता लोक करत आहेत. त्याचाच भाग हा सेवा रस्ता आहे. त्याचे काम का केले जात नाही, याचे उत्तर कुणाकडेच नाही. कदाचित, सहापदरी करताना तो उकरायचाच आहे, तर दोन-चार वर्षे थांबू, असे सरकारी खजिन्याची प्रचंड चिंता करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाटत असावे.

कागदी नाव फिरवा, आनंद घ्या...!

कुणाला जर आपले लहानपणीचे दिवस आठवत असतील तर, ‘वो कागज की कश्‍ती, वो बारीश का पाणी’ आठवत असेल तर चिंता करू नका... तुम्ही निवांत वेळ काढा आणि वसंतदादा मार्केट यार्डच्या समोर तळे साचले आहेच, त्यात कागदी नावा फिरवण्याचा आनंद घ्या. यंदा पाऊस कमी दिसतोय, कृष्णा नदीला पाणी कमी आले तर या डबक्यात कागदी नावांच्या शर्यती घेण्याचा विचार करायलाही हरकत नाही, अशी कुजबुज सध्या सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar LPG Link : आधार-LPG लिंक नाही? तर सबसिडी बंद होणार! सरकारचा इशारा; आजच घरबसल्या 'असे' करा लिंक

Igatpuri Crime : शिक्षकी पेशाला काळिमा! नराधम शिक्षकाचा चिमुकलीवर ८ महिने अत्याचार; घोटी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक एकत्र कोकण भवनला जाणार

Shiv–Shahu Vikas Aghad : पराभवातून बोध घेणार का? शिव–शाहू आघाडीपुढे मोठे आव्हान

जय शाह यांनी डोळे वटारताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भाषा बदलली; बांगलादेशला जाहीर सपोर्ट करणारे आता कोपऱ्यात जाऊन बसले, म्हणतात...

SCROLL FOR NEXT