Set exam postponed Decision of Mysore University education marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

 ब्रेकिंग : सेट परीक्षा पुढे ढकलली; म्हैसुर विद्यापीठाचा निर्णय

सतीश जाधव

बेळगाव :  यंदा रविवारी (ता.11) "सेट' होणार होती. मात्र, परिवहन कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरुच असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंबंधी म्हैसुर विद्यापीठाने एक पत्रक काढून विद्यार्थ्यांना माहिती कळविली आहे. पुढील तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचेही त्या पत्रकात नमुद केले आहे.

गेल्या काही दिवसापासून राज्यात परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे राणी चन्नमा विद्यापीठाने आपल्या विविध विषयाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे सेट परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. रविवारी (ता.11) परिक्षा होणार होती, तरीही शनिवार सकाळपर्यंत या परीक्षेबद्दल चित्र स्पष्ट झाले नव्हते. काही विद्यार्थ्यांनी म्हैसूर विद्यापीठाशी संपर्क करून परीक्षेबद्दल माहिती विचारली. मात्र, शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान विद्यापीठाने एक पत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली.

राज्यात म्हैसूर विद्यापीठाकडून सेट परीक्षेचे आयोजन केले जाते. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्जही भरले आहेत. राणी चन्नम्मा विद्यापीठाने बेळगाव शहरात विविध केंद्रे दिली होती. सध्या परीक्षा रद्द झाली आहे. त्यामुळे पुढील परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, परीक्षा केंद्र तीच राहतील की बदलतील हे तारीख जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. म्हैसूर विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण स्पष्ट केले नसून काही कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचे पत्रकात नमुद केले आहे. के-सेट वेबसाईटवर यांची माहिती कळविली जाईल असे, म्हैसूर विद्यापीठ के-सेट संयोजक प्रा. एच. राजशेखर यांनी कळविले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

World Sparrow Day : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ शहरातून हरवलेली चिऊताई पुन्हा कशी येईल?

राज्य सहकारी बँकेची ‘थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर; हजारो कोटींच्या कर्ज निपटाऱ्याला गती

Latest Marathi News Live Update : लोणावळा नगरपरिषदेत तणाव; नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कॅबिनला ठोकले टाळे...

SCROLL FOR NEXT