seven more people institutional quarantines in contact of corona petaint 
पश्चिम महाराष्ट्र

त्यांच्या संपर्कातील आणखी 7 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये

सकाळवृत्तसेवा

सांगली : येथील रेव्हेन्यू कॉलनीतील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील आणखी 7 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच 7 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 20 जण इन्स्टिट्यूशनल, तर 53 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, कंटेन्मेट झोनमधील 350 कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला असून, बफर झोनमधील एक हजार कुटुंबांचा सर्व्हे सुरू झाल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिली.

मुंबईतून घुसखोरी केलेल्या दोघांना "कोरोना'ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी एकजण सांगलीतील दक्षिण शिवाजीनगरमधील रेव्हेन्यू कॉलनीतील आहे. एका बड्या घरातील व्यक्ती मुंबईहून 1 मे रोजी सांगलीत आली होती. एक तारखेला मित्राच्या तो घरी दुपारपर्यंत थांबला, त्यानंतर अन्यत्र गेला होता. 3 मे रोजी तो रेव्हेन्यू कॉलनीतील घरी गेला. तेव्हा कुटुंबाने आणि परिसरातील लोकांनी त्याला क्वारंटाईन होण्यास सांगितले.

त्याच्या भावाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर घुसखोरी केल्याबद्दल चार दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन संस्थात्मक क्वारंटाईन केले व त्याचा स्वॅब घेतला आला होता. त्याचा अहवाल आज "पॉझिटिव्ह' आला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील विश्रामबागच्या तीन पोलिसांसह, पत्नीसह 13 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. आज आणखी 7 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचे "स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी घेतले नव्हते. 

नऊ जण निगेटिव्ह 
स्क्रीनिंग ओपीडीमधील 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT