Sewage came to the streets again in Miraj city 
पश्चिम महाराष्ट्र

मिरज शहरात पुन्हा सांडपाणी आले रस्त्यावर 

प्रमोद जेरे

मिरज : शहरातील रेल्वे स्थानक परिसरास पुन्हा एकदा सांडपाण्याने विळखा घातला आहे. साहजिकच येथील साथीचे रोग आणि दुर्गंधीने या परिसरास वेढले आहे. गेल्या किमान महिनाभरापासुन या परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक सांडपाण्याच्या विळख्यात सापडले आहेत. यापैकी अनेक नागरिकांनी तर घरच सोडले आहे. 

हॉटेल व्यावसायिकांना तर केवळ दुर्गंधी आणि रस्त्यावर पसरलेल्या मैल्यामुळे नाईलाजाने आपले व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या सांडपाण्यातच महापालिकेतील कारभा-यांनी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा प्रारंभ भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उरकण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या संतापास पाटील यांना सामोरे जावे लागले. 

महापालिकेतील कारभाऱ्यांच्या प्रतापामुळेच चंद्रकांत पाटील यांना हा मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत पाटील यांनी महापालिकेतील कारभाऱ्यांची हजेरी घेतल्यानतंर हे पाणी दोन दिवसांनी बंद झाले. पण आजपासून (बुधवार) याच सांडपाण्याने पुन्हा रेल्वे स्थानकास वेढा घातला आहे. साहजिकच आता येथील नागरिक आणि व्यावसायिक पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT