Sexual Abuse of Women Employees in Ahmednagar Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

साहेब म्हणतात, तू मला शरीरसुख दे... नगर महापालिकेतील महिलेचे मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणं

सकाळ वृत्तसेवा

नगर ः महापालिकेतील एक अधिकारी पदाचा गैरवापर करत आहे. तो महिला कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतो. महिला कर्मचाऱ्यांना शरीरसुखाची मागणी होत आहे. एका महिला कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. मात्र, त्या पत्रात अधिकाऱ्याचे नाव असले तरी तक्रारदार महिलेच्या नावाचा उल्लेख नाही. 
त्या अधिकाऱ्याची बदली न झाल्यास जीवाचे बरेवाईट करण्याचाही इशारा दिला आहे. 

या पत्रामुळे रंगिला कारभार चव्हाट्यावर आला आहे. काहींनी नगर महापालिकेत महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आल्याचे सांगितले. 
त्या पत्रात म्हटले आहे की, मी व माझ्यासारख्या महिला नगर महापालिकेच्या कर्मचारी आहेत. आमच्या महापालिकेत आलेले ते अधिकारी महिलांना ब्लॅकमेल करतात. शरीरसुखाची मागणी करतात. आतापर्यंत बऱ्याच महिला कर्मचाऱ्यांना त्यांचा असा अनुभव आला आहे. पदाधिकारी, अधिकारी व स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून भीती दाखवली जाते. दबाव टाकून महिलांना वश करण्याचा प्रयत्न होतो. युनियनचे पदाधिकारीही त्याला पाठीशी घालतात. 

तक्रार करून उपयोग नाही
महापालिकेत तक्रार कोणाकडे करावी हा संभ्रम आहे. कारण या अधिकाऱ्यावर महापालिकेतील पदाधिकारी व अधिकारी यांची मर्जी आहे. त्यामुळे तो मनमानी करतो. जोपर्यंत या कर्मचाऱ्याला नगर महापालिकेतून दुसरीकडे पाठवत नाही. तोपर्यंत त्याच्या जाचाला कंटाळून मोठी दुर्घटना झालेली असेल. याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल. आपण तातडीने लक्ष घालून महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी व या कर्मचाऱ्याला शासन करावे. ते निनावी पत्र जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाले होते. मात्र, आज त्याची वाच्यता झाली. 

यापूर्वीही झाला होता आरोप 
महापालिकेत दीड वर्षांपूवी वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात महिला कर्मचाऱ्यांनी शारीरिक छळाचा आरोप केला होता. मात्र, त्यावेळी हे प्रकरण वरिष्ठ पातळीपर्यंत गेले नव्हतं. 

हे खोटंय, साफ खोटय. 
असं काहीही झालेलं नाही. जर तसं असतं तर त्या महिलेने पोलिसांत तक्रार करायला पाहिजे होती. परंतु मीच आता आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितल्याची प्रतिक्रिया संबंधित अधिकारी माध्यमांना देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

Latest Marathi News Live Update: कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षकांचा बीड दौरा

दुष्काळी दौऱ्याच्या गर्दीवर डोळा; लुटीचा डाव भोकरदन पोलिसांनी २४ तासांत उधळला!

SCROLL FOR NEXT