Sangli Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत पडक्या स्वच्छतागृहात नेऊन 9 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार; संतप्त जमावाकडून घटनास्थळाची तोडफोड

Sanjaynagar Police Case : घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने घटनास्थळाची तोडफोड केली.

सकाळ डिजिटल टीम

बालिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली होती. जेथे गुन्हा घडला, तेथे दोनशेहून अधिक जणांचा जमाव जमला.

सांगली : शहरातील विस्तारित परिसरातील एका वसाहतीत राहणाऱ्या नऊ वर्षांच्या बालिकेवर मोबाईल दाखवण्याच्या आमिषाने पडक्या सार्वजनिक स्वच्छतागृह परिसरात अश्‍लील कृत्य करत लैंगिक अत्याचार केले. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या कुटुंबीयांनी संजयनगर पोलिसांत (Sanjaynagar Police) फिर्याद दिली. त्यानुसार ईश्‍वर महादेव कांबळे (वय २६) याला अटक केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने घटनास्थळाची तोडफोड केली. भाजपचे दीपक माने यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारत संशयितांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित ईश्‍वर कांबळे याच्यावर यापूर्वी मारामारीचा गुन्हा दाखल आहे. पीडित बालिका काल दुपारी साडेतीनच्या सुमारास घराबाहेर खेळत होती. यावेळी संशयित कांबळे तिच्याजवळ गेला. तिला मोबाईल दाखवण्याचे आमिष दाखवून परिसरातील एका पडक्या सार्वजनिक स्वच्छतागृहात घेऊन जात तिच्याशी अश्लील कृत्य करत अत्याचार केले. यावेळी परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पहिला. यावेळी संशयित कांबळे तेथून पळून गेला.

पीडित मुलगी घरी गेली. यावेळी संबंधिताने घडलेला प्रकार पीडितेच्या आई आणि वडिलांना सांगितला. यावेळी आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता संशयित कांबळे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यानंतर पीडितेच्या आईने संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी संशयित कांबळे याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर पोलिसांनी ‘पोक्सो’अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षकांना गांजा

जेथे अत्याचार घडला, त्याच परिसरात गांजाची झाडे नागरिकांना मिळाली. घटनास्थळ परिसरात गांजासह अमली पदार्थांची नशा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तातडीने यावर कठोर कारवाईसाठी ही गांजाची झाडे पोलिस निरीक्षक कुरळे यांना दिली.

पोलिस कोठडी

संशयितास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संजयनगर पोलिसांनी तातडीने अटकेची कारवाई केल्याने तणाव निवळला. संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

दोनशे नागरिकांचा ठिय्या

बालिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली होती. जेथे गुन्हा घडला, तेथे दोनशेहून अधिक जणांचा जमाव जमला. जमावाने बंद पडलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची तोडफोड करत कठोर कारवाईसाठी रस्त्यावरच ठिय्या मारला. यावेळी संजयनगरचे पोलिस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी धाव घेत नागरिकांशी संवाद साधून कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT