कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे सहकुटुंब दोन दिवसासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज दाखल झाले. आज (गुरुवार ता.22) दुपारी एकच्या सुमारास खासदार पवार यांचे सर्किट हाउस येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. खासदार पवार यांना भेटण्यासाठी अक्षरक्ष: कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. यावेळी खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, नावेद मुश्रीफ यांचेसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार पवार यांना भेटण्यासाठी कोल्हापूर, सांगली तसेच बेळगाव येथील काही शिष्टमंडळांनीही उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्विकारण्यासाठी त्यांनी सर्किट हाउसच्या हॉलमध्ये हजेरी लावली. यावेळी खासदार पवार यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी चांगलीच चढाओढ पहायला मिळाली. अर्धा तास ते सर्किट हाउस येथे होते. यानंतर ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी निघून गेले.
कोणाला सुचना, कोणाला कानपिचक्या?
खासदार पवार यांचा कोल्हापुरात दोन दिवस मुक्काम आहे. या मुक्कामात ते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही सुचना देण्याची शक्यता आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदार संघात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोल्हापूर लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीतूनच विरोध वाढला आहे. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार पवार हे खासदार महाडिक व आमदार पाटील यांना या दौऱ्यात काही सुचना देतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. तसेच हातकणंगले लोकसभा मतदार संघात खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यावरुन माजी खासदार निवेदिता माने यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात उलट भूमिका घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार पवार हे कोणाला सुचना आणि कोणाला कानपिचक्या देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
खासदार महाडिक यांच्याबाबतची अफवा झाली उघड
खासदार शरद पवार यांच्या सोबत पुण्याहून खासदार धनंजय महाडिक हे देखील येत असल्याची अफवा, सर्किट हाउस येथील कार्यकर्त्यांमध्ये पसरविण्यात आली होती. खासदार महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळेच महाडिक हे खासदार पवार यांच्यासोबत असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. दरम्यान खासदार पवार यांचे आगमन होण्यापूर्वी अर्धा तास खासदार महाडिक यांचे सर्किट हाउस येथे आगमन झाले. त्यांचे स्वागत आर. के. पोवार यांनी केले. महाडिक हे कोल्हापुरात असताना जाणीवपूर्वक कोणीतरी ते खासदार पवार यांच्यासोबत असल्याची पसरवलेली अफवा मात्र उघड झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.