Share Market Scam
Share Market Scam sakal
पश्चिम महाराष्ट्र

शेअर मार्केटचा भुलभुलैय्या : बनेवाडीच्या भामट्याला गावपुढाऱ्यांचे ‘अभय’

शांताराम पाटील

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम २३० कोटींपर्यंत पोहोचली आहे. आजपर्यंत एकही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, या गुंतवणुकीला भरीस घालणाऱ्यांत गावोगावच्या राजकारण्यांचा सहभाग असल्याचेही पुढे येत आहे. ही नेतेमंडळी स्वतःचे उखळ पांढरे करून आता बनेवाडीच्या भामट्याला पाठीशी घालत आहेत. तक्रार दाखल न करण्यासाठी गुंतवणूकदारांवर दबाव टाकला जात आहे.

शेअर मार्केटमध्ये ४० टक्क्यांचा अधिक परतावा मिळेल म्हणून वाळवा तालुक्यातील बनेवाडीच्या एका भामट्याने अतिशय थंड डोक्याने प्लॅनिंग करत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे पिल्लू सोडले. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी त्याने यासाठी तालुक्यातील गावोगावच्या ‘व्हाईट कॉलर’ पुढाऱ्यांना हाताशी धरून आपले जाळे विस्तारले. त्यांच्या संपर्काचा गैरफायदा घेत ओळख दाखवत गुंतवणूकदारांना फशी पाडले. ४० टक्क्यापर्यंत अधिक परतावा देतो, असे स्टॅम्पवर लिहून दिले. ठराविक नफा हाताशी लागताच त्यांना भरपूर परतावा दिला. त्‍यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्याने बनेवाडीच्या भामट्याला गाठले.

आणखी पैसे गुंतवले. त्यानेही थंड डोक्याने यांना अधिक परतावा देत वातावरणनिर्मिती केली. त्यानंतर गुंतवणुकीसाठी बनेवाडीला भाऊगर्दीच झाली. हळूहळू असे गुंतवणूकदार ‘बकरे’ दाखवण्याची राजकारण्यांतच स्पर्धा सुरू झाली. संख्या वाढत गेली. सुशिक्षितही अडकत गेले. अगदी कर्जे काढून, दडवून ठेवलेला पैसाही बनेवाडी मार्गे शेअर मार्केटमध्ये गुंतवला जाऊ लागला. त्यातून या नेत्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. सध्या तालुक्यातून झालेल्या गुंतवणुकीचा आकडा २३० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

आता बिंग फुटताच आता छाती ठोकून गुंतवणूक करा, म्हणणारे गायब झाले आहेत. फसलेल्यांमध्ये सामान्य रोजगाऱ्यांपासून शिक्षक, डॉक्टर, वकील, शासकीय कर्मचारी, बागायतदार, उद्योगपती, वाळूवाले, खाण वाले अशी मंडळी आहेत. आता बनेवाडीचा भामटा मुंबईला पसार झाला आहे. गेल्या वर्षभरापासून पैसे यायचे बंद झाले. लाखोंची कर्जे थकित गेली आहेत. आता गावोगावच्या नेत्यांचे फोनही आता ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. गुंतवणूकदार त्यांचे उंबरठे झिजवत आहेत. आता अंधारातले व्यवहार उजेडात येणार म्हटल्यावर त्यांनीच बनेवाडीच्या पठ्ठ्याला शोधून काढले, इस्लामपुरात आणले. गुंतवणूकदारांच्या समोर उभे केले. त्याने ‘‘माझ्याकडे दमडी नाही, मला मारा, गोळ्या घाला अथवा काहीही करा, पैसे नाहीत...’’ असे उत्तर ऐकवले. एकप्रकारे पुढाऱ्यांनी आपली जबाबदारीच झटकली आहे.

भामट्याला हजर करून पुढाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, याचीही खबरदारी ते घेत आहेत. तक्रार नाही म्हणून पोलिस दखल घेत नाहीत. अनेकांनी जमिनी विकल्या आहेत. इस्लामपुरातील एक पतसंस्थाही अडचणीत आली आहे. भामट्याची खासगी गुंतवणूक शोधणे; तसेच सहलाभार्थी शोधण्यासाठी पोलिस तपासच हवा. त्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांनी पोलिसांना आदेश द्यावेत.

- राजू पाटील, वाटेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT