Shirala city will soon become a 'solar' city 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा शहर लवकरच बनणार 'सौर' सिटी

शिवाजी चौगुले

शिराळा : शिराळा शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी शिवणी येथे एक एकर जागा उपलब्ध झाली आहे. शिराळा शहर लवकरच सौर सिटी बनवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम व मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली. येथे व्यापारी सभागृहात सर्वसाधारण सभा झाला. 

ते म्हणाले,"शहरातील कचरा व्यवस्थापनसाठी जागा अपुरी होती. या जागेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. शिवणीतील एक एकर क्षेत्र कचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध झाले आहे.''
 
ते म्हणाले,"शहरात सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी प्रकल्प सल्लागार नेमणे, महिला व बालकल्याण विभागांतर्गत 3 लाख रुपये मंजूर आहेत. त्यापैकी अंगणवाडी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे व महिला दिनासाठी निधी खर्च करणे, प्रदूषण विरहित वाहतुकीस प्रोहत्साहन म्हणून शहरात चार ठिकाणी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करणे, बांधकाम विभाग कामांना मंजुरी देणे, शहराच्या वाढीव भागास पाणी वितरण व्यवस्था करणे, घनकचरा ठेकेदाराकडून नगरपंचयात मालकीच्या घंटा गाडीसाठी मासिक भाडे घेणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान अंतर्गत निधी मंजूर करणे, बाजार भरवण्यासाठी सोयीची जागा उपलब्ध करून देणे विषयावर चर्चा करण्यात आली. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी आमच्याही प्रभागात विकास निधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या निधी पैकी काही निधी देण्याची मागणी केली. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena: शिवसेनेत मोठे बदल होणार! 'काम करा नाहीतर पद सोडा...'; पदाधिकाऱ्यांना कडक इशारा, पडद्यामागे काय घडतंय?

Mumbai News: मुंबईकरांसाठी गूडन्यूज! १२ डब्यांच्या २३८ नव्या लोकल खरेदी करणार; १९ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Gokul dairy election news : गोकुळ दूध संघाची निवडणूक लांबणीवर, १२०० दूध संस्थांच्या निर्णयानंतरच निवडणुका; कोर्टाने दिले थेट आदेश

लक्ष्मीकांत बेर्डेंचं गाजलेलं नाटक 'शांतेचं कार्टं चालू आहे' पुन्हा रंगभूमीवर ! प्रियदर्शन-विशाखाची रंगणार जुगलबंदी

Agniveer MR Musician Recruitment 2026 : आता संगीतकार बनू शकतात अग्निवीर! भारतीय नौदलात भरती होण्याची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT