crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

Shirala Crime : अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार; आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत आरोपीवर जातीवाचक व पोक्सो कायद्याअंतर्गत शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिराळा - शिराळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत आरोपी अजिंक्य शिवाजी पाटील (वय २४) याच्यावर जातीवाचक व पोक्सो कायद्याअंतर्गत शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,संशयीत अजिंक्य पाटील याने अल्पवयीन मुलीस फूस लावून ३ ते ४ सप्टेंबरला रात्री १ वाजण्याच्या दरम्यान घरातून फूस लावून पळवून नेले. कोल्हापूर येथे ४ सप्टेंबर ला तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकरणी अजिंक्य यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Active Again मॉन्सून पुन्हा सक्रीय! रायगड, पुण्यापर्यंत पोहोचला, ४८ तासात मुंबईत दाखल होणार

Mahabaleshwar Rescue Operation : आंबेनळी घाटात लघुशंकेसाठी थांबणं बेतलं जीवावर; तोल जाऊन थेट 200 फूट खोल दरीत कोसळला युवक, ट्रेकर्सनी कसं वाचवलं?

Navi Mumbai : घृणास्पद कृत्य! अल्पवयीन बहिणींना देहव्यापाराच्या दलदलीत ढकललं; शिंदेसेना आणि भाजपचा नेता अटकेत

ICC Penalty: १२ गुण वजा... खेळाडूंच्या मॅच फीमधून ५० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल; ICC ने इंग्लंडच्या संघावर का केली कारवाई?

Pune: कात्रज घाटातील कचरा प्रश्नाची जबाबदारी नेमकी कोणाची?

SCROLL FOR NEXT