

Minor Girl Prostitution Case
ESakal
नवी मुंबई : उलवे येथील दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना वेश्याव्यवसायात ढकलल्याच्या प्रकरणात स्वीकृत नगरसेवकासह तिघांचा सहभाग उघड झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पेण येथील भाजपचा माजी नगरसेवक कुणाल नाईक (वय ३१), शिवसेना शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक उपेंद्र कोलाडकर (३२), व्यावसायिक प्रमोद पाटील (४३) आणि कंत्राटदार अच्युत पाटील (४२) यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती उलवे पोलिसांनी दिली.