Shiv Sena burns statue of former Karnataka ministers at maihsal border sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

म्हैसाळ सिमेवर कर्नाटकच्या माजी मंत्र्यांच्या पुतळ्याचे शिवसेनेने केले दहन...

सकाळ वृत्तसेवा

म्हैसाळ (सांगली) - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बद्दल कर्नाटकाचे माजी मंत्री बसवराज होरट्टी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे मोठे पडसाद आज ता.२९ रोजी कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील म्हैसाळ (ता.मिरज) बाॅड्री येथे उमटले.

कर्नाटक रक्षक वेदिका संघटनेच्या उपस्थितीने तणाव

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयराप्पा,कर्नाटक नवनिर्माण सेनेचा भिमाशंकर पाटील यांच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेच्या वतीने तिरडी मोर्चा काढण्यात आला.कर्नाटक रक्षक वेदिका संघटनेचे कार्यकर्ते देखील येथे आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दोन्ही बाजूकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली.तणावाच्या पार्श्वभूमीवर मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

'सिमेवर येतोय,गोळ्या घालायला ये' असे केले होते आव्हान

सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.कर्नाटक रक्षक वेदिका संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केल्याने मोठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेचा भिमाशंकर पाटील याला काल दूरध्वनीवरून संपर्क करुन सिमेवर येतोय गोळ्या घालायला ये असे आव्हान दिले होते.या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलीसांनी देखील आपला बंदोबस्त आपल्या राज्यांच्या हद्दीत तैनात केला होता.यावेळी विशाल रजपुत, संजय काटे,अमोल पाटील, चंद्रकांत मैगुरे,पप्पू शिंदे, महादेव मगदुम,शंभोराज काटकर आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT