Shivsena March Sakal
पश्चिम महाराष्ट्र

कोगनोळी महामार्गावर शिवसेनेचा मोर्चा; मशाल रोखल्याने रास्ता रोको

1 नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक काळा दिन पाळतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला मशाल घेऊन निघाले होते.

सकाळ वृत्तसेवा

1 नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक काळा दिन पाळतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला मशाल घेऊन निघाले होते.

कोगनोळी - 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक काळा दिन पाळतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला मशाल घेऊन निघाले होते. त्यांना पोलिसांनी रोखल्याने येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी दूधगंगा पुलावर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी काही काळ रास्तारोको करत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. तसेच घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, आवाज कुणाचा शिवसेनेचा, बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, बेळगाव आमचं आहे, गाव आमचं आहे. कारवार आमचं आहे, कर्नाटकामध्ये मराठीपण माणूस आहे. आम्ही नाही ऐकणार यांचं. ही मशाल बेळगाव जिल्ह्यामध्ये नक्कीच पोहोचणार असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, देशातील व विशेषतः या राज्यातील लोकशाही संपलेली आहे. येथे भाजपचे सरकार आहे. केंद्रामध्येही भाजपचे सरकार आहे. आज सगळीकडे अस्वस्थता आहे. भाजपची दादागिरी आहे. म्हणूनच या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. मराठी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. ताकद मिळाली पाहिजे आणि ती आम्ही देणारच.

कोल्हापूर शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, बेळगाव तालुकाप्रमुख सचिन गोर्ले, शहरप्रमुख दिलीप बेल्लूरकर, उपशहरप्रमुख राजकुमार बोकडे, संपर्कप्रमुख अरविंद नागनूरे, उपतालुकाप्रमुख पिराजी शिंदे, विभागप्रमुख रमेश माळवी, विजय सावंत यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कर्नाटक पोलिस खात्यातर्फे अप्पर पोलिस अधीक्षक महानिंग नंदगावी, पोलिस उपाधीक्षक बसवराज यलिगार, मनोजकुमार नाईक, वीरेश गोडमणी, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, बी. एस‌. तळवार, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार तर महाराष्ट्र पोलिस खात्याच्या वतीने कागलचे पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षका मोनिका खडके यांच्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातील शेकडो पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT