sangli Political News
sangli Political News 
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेला 'किंगमेकर' होण्याची संधी, सेना रुजणार की नुसतीच वाजणार?

सकाळ डिजिटल टीम

'गेल्या दोन विधानसभा धनुष्यबाण चिन्हावर विजयी झालेले बाबर शंभर टक्के शिवसैनिक झाले नाहीत?'

सांगली - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता ठरवताना शिवसेनेला पुन्हा एकदा ‘किंगमेकर’ होण्याची संधी मिळू शकते. गेल्या पंचवार्षिकमध्ये तीन सदस्य असताना उपाध्यक्षपदी संधी साधणारी शिवसेना यावेळी दहाचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न करू शकते. खानापूर, आटपाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यात पक्षाला संधी आहे. जिल्हाप्रमुखांच्या वाळवा आणि कडेगाव तालुक्यात पक्ष किमान खाते उघडेल का, हेही पाहावे लागेल. (sangli Political News)

आमदार अनिल बाबर शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. सोबतीला कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे, आटपाडीत जिल्हा बँक संचालक तानाजी पाटील यांची ताकद आणि गट प्रबळ आहे. या तीन तालुक्यांत धनुष्यबाण विजयी वेध घेण्याची क्षमता राखून आहे. बाबर महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आणि त्याकडे कानाडोळा करणाऱ्या स्वपक्षावर सतत नाराजी बोलून दाखवत आहेत.

गेल्या दोन विधानसभा धनुष्यबाण चिन्हावर विजयी झालेले बाबर शंभर टक्के शिवसैनिक झाले नाहीत, असा काहींचा आरोप आहे. तो पुसून काढण्याचा कसोशीने प्रयत्न ते करू शकतात.
या लढ्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न आकाराला येण्याची शक्यता कमी आहे. किमान खानापूर, आटपाडी तालुक्यात तरी हे गणित जमेल असे दिसत नाही. त्यामुळे तेथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा लढा होऊ शकतो.

शिवसेना ग्रामीण भागात काकणभर चढ ठरावी, यासाठी बाबर-पाटील यांची गट्टी कशी रंगते? खासदार संजय पाटील यांच्याशी बाबर यांचा नव्याने सुरू झालेला संघर्ष कसे वळण घेतो, राष्ट्रवादीला खिंडीत गाठायला भाजप-शिवसेना छुपी युती करते का, असे काही काही प्रश्‍न आहेत. शिवसेना दोन तालुक्यांत तरी आपला पॅटर्न स्वतः ठरवेल. त्याची कमान माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, सुहास शिंदे, तानाजी पाटील अशा युवा नेत्यांकडे असेल.

माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा शिवसेनेशी घरोबा वाढला आहे. अलीकडे प्रमुख नेत्यांच्या दौऱ्यात ते हजेरी लावत आहेत. त्यामुळे कवठेमहांकाळच्या हक्काच्या गडात ते भगवा फडकवायला इच्छुक आहेत. शिवसेनेची थोडी रसद मिळाली तर त्यात यश मिळेल, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना आहे. त्यांचे सध्या दोन सदस्य आहेत.

जुन्यांचा प्रभाव किती ?

जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, माजी संघटक बजरंग पाटील, दिनकर पाटील अशा जुन्या शिवसैनिकांचा किती प्रभाव पडेल, हे पाहावे लागेल. शिवसेना इथे रुजतेय की नुसतीच वाजतेय, याचे उत्तर या निवडणुकीतून मिळेल. जत, मिरज तालुक्यात शिवसेनेचा एक वोटबेस आहे. तो वाढवण्यात सेना कमी पडली आहे. यावेळी पुन्हा मांडणी केली तर या तालुक्यांतही त्यांना यश मिळवण्याची संधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

SCROLL FOR NEXT