belgaum esakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात शांतता भंगचा प्रयत्न; नरगुंदकर भावे चौकात पुतळा उभारणार?

प्रशासनाने शहराची शांतता भंग करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करावी

मिलिंद देसाई

बेळगाव : कन्नडिगांची कोल्हेकोई पुन्हा एकदा सुरू झाली असून शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात नरगुंदकर भावे चौक येथे कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी यांनी पुतळा उभारण्यासाठी पाहणी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने शहराची शांतता भंग करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे. (belgaum Udpate)

गेल्या काही दिवसांपूर्वी सह्याद्रीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी नागरिकांनी चौथरा बांधला होता. त्याठिकाणी शिवाजी राजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन पुतळा ताब्यात घेतला. यावेळी 40 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे शहरवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली. नरगुंदकर भावे चौक येथे पुतळा बसवण्यासाठी रात्रीच्या वेळी पाहणी करण्यात असल्याची माहिती रहिवाश्यांनी दिली आहे.

मनगुत्ती येथे मागीलवर्षी छत्रपती शिवाजी मराजांचा पुतळा रात्रीच्या वेळी हटवण्यात आल्यानंतर सीमाभागातून तीव्र संताप उमटला. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी पिरणवाडी येथे अनधिकृतरित्या संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. तसेच गेल्यावर्षीही 14 ऑगस्ट रोजी रात्रीच्यावेळी पुतळा उभारण्यात आला होता. तसाच प्रकार आज रात्रीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सजग राहणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र सैनांनी नरगुंदकर भावे यांना बेळगाव येथे फाशी देण्यात आली होती. त्यांच्या स्मरणार्थ नरगुंदकर भावे चौक येथे भावे यांचा अनेक वर्षांपूर्वी अर्ध पुतळा उभारण्यात आला होता. तसेच हा चौक व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतानाही या ठिकाणी भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

Iran Israel War Anxiety : युद्धाची चाहूल आणि मनातली घालमेल; असुरक्षिततेच्या काळात भावनिक स्थैर्य कसे राखाल?

Gambhir on Dhoni: 'माझी इच्छा आहे की एक दिवस त्याने माझ्या जागेवर यावं आणि मी त्याला...' धोनीबद्दल काय म्हणाला गंभीर?

SCROLL FOR NEXT