पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे सुखरुप; पुढील उपचारार्थ मुंबईला रवाना

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मंगळवारी (ता. १८) एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजेंना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सातारा आणि जावळी तालुक्यात पसरताच एक एक कार्यकर्ते रुग्णालय परिसरात जमू लागले. वैद्यकीय उपचारानंतर शिवेंद्रसिंहराजेंना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले, चुलत बंधू विक्रमसिंहराजे भोसले उपस्तिथ होते.

खरंतर, राजकारणी मंडळी म्हटलं की दिवसभर कामाचा व्याप आणि ठिकठिकाणी दौरे असतात. वारंवार सभा आणि कार्यक्रमासाठी फिरत राहावं लागतं. अशात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अनेकदा भर सभेत राजकारण्यांना कामाच्या व्यापामुळे त्रास झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे कामाच्या तणावात आरोग्याची काळजी घेणं फार शक्य होत नाही.

दरम्यान आज (बुधवार) सकाळच्या प्रहरी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची पुन्हा वैदयकीय अधिकारी यांनी तपासणी केली. यामध्ये फारशी चिंता करण्यासारखे काही नसल्याचे स्पष्ट झाले. पुढील उपचारासाठी तसेच विविध वैद्यकीय तपासणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे मुंबईला रवाना झाला. दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंची तब्येत ठीक आहे, अधिक तपासणीसाठी मुंबईला नेले आहे. तरी नागरीकांनी काळजी करु नये असे आवाहन त्यांच्या मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT