पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत शिवसैनिक आक्रमक; राणेंच्या पोस्टरला फासले काळे

गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शैलेश पेटकर-सकाळ वृत्तसेवा

सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज येथे उमटले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर लावलेल्या शुभेच्छा फलकावरील राणे यांच्या प्रतिमेला काळे फासले. त्यानंतर शहरात पोलिसांनी तत्काळ धाव घेत तो फलक (sangli update) उतरवला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल कांबळे यांना ताब्यात घेतले आहे.

केंद्रीय मंत्री राणे यांनी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी बोलताना त्यांच्या कानशिलात लावले असते असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर सांगलीतही आज सकाळी शिवसेनेने (shivsena) शहरात निदर्शने केली. कुपवाड येथे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राणे यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

दरम्यान आज सकाळीच सामसूम असताना शिवसेना कार्यकर्ते कांबळे यांनी धाव घेत फलकाला काळे फासले. समाज माध्यमांवरून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पोलिस कार्यालयाच्या आवारात धावले. तेथे पोलिस छावणीचे स्वरुप आले. भाजपचे कार्यकर्तेही धावले. पोलिसांनी समजून काढत फलक खाली उतरवला. दुपारनंतर शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला. कुपवाड,मिरज, सांगलीत शिवसेनेचे कार्यकर्ते जमा होत आहेत. त्यामुळे शहरातील वातावरणात तणाव वाढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

SCROLL FOR NEXT