shivsena.jpg
shivsena.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महिन्याभरात विस्कटली शिवसेनेची घडी

परशुराम कोकणे

सोलापूर : प्रबळ दावेदार असूनही उमेदवारी न मिळाल्याने झालेली बंडखोरी.., निष्ठावंतांना डावलून ठरावीक लोकांना मिळणारा सन्मान.., जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि समन्वयक शिवाजी सावंत यांच्याविषयी असलेला रोष.., गेल्या महिन्याभरात विस्कटलेली पक्षाची घडी.. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार बार्शीतील दिलीप सोपल, माढ्याचे संजय कोकाटे, करमाळ्याच्या रश्‍मी बागल, सांगोल्याचे शहाजी पाटील, मोहोळचे नागनाथ क्षीरसागर, शहर मध्यचे दिलीप माने आदी उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

दरम्यान, उमेदवारी वाटपानंतर जिल्ह्यातील शिवसेनेत बरीच पडझड झाली आहे. मात्र, काहीच झाले नाही असे दाखवण्याचा प्रयत्न सावंत बंधूंसह अन्य पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. महेश कोठे यांनी तर उघडउघड पक्षातील चौकडीवर टीका केली. मेळाव्यासह गल्लीबोळातील बैठकीतही ते शिवसेनेत जातीचे राजकारण कसे चालतेय हे लोकांना सांगत आहेत. 

माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी पक्षात काहीच अलबेल नसल्याचे बोलून दाखविले आहे. मनोज शेजवाल यांनी शिवसेनेला मोहोळमधून जोरदार लढत देण्याची तयारी केली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांचे धनुष्यबाण रोखण्यासाठी बंडखोर नारायण पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत. अन्य विधानसभा मतदारसंघात थोडीफार धुसफूस आहेच, पण पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला "अच्छे दिन' आल्याचे सांगत पक्षप्रमुखांच्या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT