shivsrushti
shivsrushti 
पश्चिम महाराष्ट्र

अन्नछत्र मंडळात 'शिवस्रृष्टी'चे महाराष्ट्र दिनी लोकार्पण

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून ' शिवस्रृष्टी ' ची निर्मिती करण्यात आली असून दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांनी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांच्याकडे अन्नछत्र मंडळात शिवस्मारक (गड -किल्लेस्रृष्टी) निर्माण करण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी त्यांच्या शिल्पकलेतून ही संकल्पना साकारली आहे. श्रीमंत विजयसिंहराजे  प्रतिष्ठानच्या वतीने लोकार्पण सोहळा मंगळवार दि १ मे रोजी सायंकाळी ६.०५ वाजता करण्यात येणार आहे.यावेळी अन्नछत्र मंडळाचे सचिव शाम मोरे,मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले,जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर आणि सर्व विश्वस्तांची उपस्थिती राहणार आहे.या शिवस्रृष्टीत महाराजांच्या जीवनातले महत्वाचे गड व किल्ले यांचे आकर्षक भित्तिशिल्प उभारण्यात आले आहे.

त्यात शिवरायांचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला याचबरोबर रायगड, तोरणा, पुरंदर, सिंधुदुर्ग, प्रतापगड, राजगड, रायगड, वेल्लोरी आणि शेवटचा गोव्यातला अग्वाद जो पोर्तुगीजांच्या ताब्यातून घेतलेला भुईकोट किल्ला यांचा समावेश केला गेला आहे. ज्यातून महाराजांच्या जीवनातील महत्वाचे किल्ले ज्याने जनतेला प्रेरणा मिळेल अश्या गोष्टी यात समाविष्ट आहेत.या शिवस्रृष्टीत कोल्हापूरच्या चौगुले यांनी बनविलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि मावळे आदी बसविण्यात आला आहे. या शिवस्रृष्टी समोर संगीतमय कारंजे निर्माण करण्यात आले आहेत.आणि ५० खांबे ज्यात खास विद्युत कंदील बसवून पथदिव्यांचा मार्ग निर्माण करण्यात आला आहे. ज्यातून शिवस्रृष्टी पाहण्यासाठी जाता येणार आहे.त्याचप्रमाणे तेथे दोन्ही बाजूंना दोन आकर्षक तोफाही बसविण्यात आले आहेत.या शिल्पाच्या निर्मितीत मधुकर जिनगरे आणि रोहित गोळे पुणे यांची मोलाची कला यात अंतर्भूत आहे.एकंदरीत ही शिवस्रृष्टी अन्नछत्राच्या पर्यायाने अक्कलकोट पर्यटनात सौंदर्य निर्माण करणारा ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT