1Corona_Danger_19.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ! सांगलीतील आणखी 12 जणांना कोरोना 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्त कुटुंबातील आणखी 12 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यांचे अहवाल दुपारी हाती आले. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण 23 झाली आहे. त्यात संबंधित कुटुंबात काम करणाऱ्या दोघा मोलकरणींचा समावेश आहे. त्यांच्यावर मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, यासोबत पाठवलेले 13 जणांचा अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. 


जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी चार रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. इस्लामपूर येथून सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जावून आलेल्यांना ही लागण झाली. त्यामुळे या चार जणांशी संबंधित लोकांना तातडीने अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांतील कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात त्याच कुटुंबाशी निगडीत 5 जणांना लागण झाल्याचा अहवाल आला आणि काल त्यात आणखी दोन जणांची भर पडली होती. आज त्यात आणखी 12 जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले असून आता जिल्ह्यातील एकूण संख्या 23 झाली आहे. 

सांगली जिल्ह्यासाठी धक्कादायक अशी माहिती आता हाती आल्याने पुन्हा एकदा सारे हादरून गेले आहेत. इस्लामपूर हाय अलर्ट करण्यात आले आहे. या कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या एकूण 39 जणांना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे अहवालही अद्याप यायचे आहेत. त्यातील कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्यांचे नमुने पाठवून तपासणी केली जात आहे. एकूणच इस्लामपुरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. 

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. आधीपासूनचे सर्वच रुग्ण येथे ठेवण्यात आले आहेत. आता अलगीकरण कक्षातून हे नवे बारा रुग्णही मिरजेत दाखल केले जाणार आहेत. या रुग्णांसोबत आणखी 13 जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. ते निगेटीव्ह आल्याने त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी निश्‍वास टाकला आहे. या लोकांना काही काळासाठी अलगीकरण कक्षात ठेवून घरी सोडले जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT