corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक....सांगली जिल्ह्यात चौघांना कोरोना 

सकाळवृत्तसेवा

सांगली- संपूर्ण जगभर धुमाकूळ घातलेल्या "कोरोना' चे चार रूग्ण सांगलीत आढळले आहेत. "कोरोना' बाधित चौघे रूग्ण इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले आहेत. चौघांचा रिपोर्ट "पॉझिटीव्ह' आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान सिव्हीलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या 12 जणांचा अहवाल मात्र "निगेटिव्ह' आला आहे. 


चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणेमध्ये कोरोना बाधित रूग्ण आढळल्यामुळे सांगली परिसरात गेले काही दिवस चिंता होती. सांगलीमध्ये कोरोना येणार तर नाही ना? याची धास्ती सर्वांना होती. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार होणारी साखळी तोडण्यासाठी सांगलीकरांनी जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद दिला. सांगली, मिरज, भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आले होते. कोरोना बाधित देशातून आलेल्या 23 जणांना आतापर्यंत त्या वॉर्डात ठेवले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परदेशवारी केलेल्या चारशेहून अधिक प्रवाशांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. 


दरम्यान तीन दिवसापूर्वी 12 संशयितांना आयसोलेशन वॉर्डात दाखल केले होते. त्यापैकी एक विटा, आष्टा, जत परिसरातील होते. त्यांचे अहवाल तीन दिवसापासून प्रलंबित होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे आज निष्पन्न झाले. ही बातमी दिलासा देणारी असतानाच आज अचानक इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याची धक्कादायक बातमी सायंकाळी समोर आली. चौघेजण नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले आहेत. 


जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी चौघांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्या चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलमधील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर मिरज सिव्हील परिसर सामसूम झाला होता. सोशल मिडियावर देखील या बातमीने खळबळ उडवून दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT