1Corona_Danger_19.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक....सांगली जिल्ह्यात चार जणांना कोरोना 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यात आज आणखी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. खानापुर, शिराळा, कडेगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात हे रुग्ण आहेत. सकाळी अहवाल प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 92 झाली असून 43 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

सुलतानगादे तालुका खानापूर येथील 57 वर्षीय महिला दिनांक 22 मे रोजी मुंबईहून आल्या होत्या तसेच करनगुली तालुका शिराळा येथील 33 वर्षीय पुरुष दिनांक 17 मे रोजी मुंबईहून आला होता, तर आंबेगाव तालुका कडेगाव येथील 36 वर्षीय पुरुष दिनांक 24 मे रोजी मुंबईहून आला होता या तिघांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर मिरज येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. 

लांडगेवाडी तालुका कवठेमहांकाळ येथील आठ वर्षीय मुलगी ही दिनांक 23 मे रोजी मुंबईहून आल्याने कम्युनिटी क्वारंटाईन मध्येच होती तिला ही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हिल येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. सुलतानगादे , करंगुली व आंबेगाव येथे कंटेनमेंट झोनची कार्यवाही तसेच अन्य प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे . 

  • आजचे नवीन पॉझिटिव्ह - 4 
  • एकुण रुग्ण - 92 
  • उपचार घेणारे रुग्ण - 43 
  • बरे झालेले रुग्ण 47 
  • मृत्यू - 2 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT