1Corona_Danger_19.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक...जांभूळवाडीच्या दोघांना कोरोना 

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : मुंबई - पुणे तसेच बाहेरून वाळवा तालुक्‍यात येणाऱ्या लोकांची धास्ती वाढतच चालली आहे. आज रात्री उशिरा वाळवा तालुक्‍यातील जांभूळवाडी येथील दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामध्ये मुंबईहून आलेल्या दाम्पत्याचा समावेश आहे. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी ही माहिती दिली. हे दोघेही मुळचे निगडी (ता. शिराळा) येथील आहेत. दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्‍यातील कुंडलवाडी येथील एक युवक पॉझिटिव्ह आला होता, त्यात आज आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्‍यात खळबळ माजली आहे. तालुका प्रशासनाने आज रात्री तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

आज पॉझिटिव्ह आलेले हे दोघे मुंबईमधील वाशीहून आले आहेत. ते मूळचे निगडी येथील आहेत. जांभूळवाडी हे त्यांचे सासर होते. या दोघांना काल मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची तपासणी करून स्वब घेण्यात आले होते. आज रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे दोघे शुक्रवारी मेहुणी आणि दोन मुलांच्यासोबत वर्षी-मुंबईहून आले होते. या दोघांच्या संपर्कात आलेल्यांचे तातडीने कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग सुरू करण्यात आले आहे. गावात अनुषंगिक उपाययोजना सुरू करण्यात आले असल्याचे नागेश पाटील यांनी सांगितले. 


"कोरोनाबाधित दाम्पत्य वाशी-मुंबईहून आले आहे. त्यांच्यासोबत दोन मुले आणि युवती असून त्यांचेही स्वब घेतले जातील. त्यांच्या कुटुंबातील सासू, सासरे आणि मेहुणा या तिघांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले जाईल. त्यांना अद्याप कोणतीही लक्षणे नाहीत. प्रशासन पूर्ण खबरदारी घेईल." 
नागेश पाटील, प्रांताधिकारी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education Decision: राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! आरटीई प्रवेशाची अंतराची अट अखेर रद्द; पालकांना २५ मार्चपर्यंत अर्जाची संधी!

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

SCROLL FOR NEXT