solapur univercity 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक...परीक्षा नियंत्रक डॉ. कोकरे कार्यमुक्‍त

तात्या लांडगे
सोलापूर : मागील दहा महिन्यांपासून वेतन निश्‍चितीच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याच्या कारणावरुन सोमवारी (ता. 9) कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे यांच्या हाती कार्यमुक्‍तीची ऑर्डर सोपविली. मात्र, परीक्षा विभागातील गैरप्रकाराची सखोल चौकशी होईपर्यंत या विभागातील एकाही अधिकारी-कर्मचाऱ्याला रजा देऊ नये, निलंबन अथवा बदली करु नये, अशी मागणी सुटा संघटनेने केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत कुलगुरुंनी दालनातून काढता पाय घेतला.

मागील वर्षभरात परीक्षा विभागात झालेला गैरव्यवहार आणि डॉ. कोकरे यांना कार्यमुक्‍त केल्यानंतर परीक्षा विभागातील संभाव्य गैरप्रकाराला कोण जबाबदार राहणार, याचे उत्तर देण्याची मागणी सुटा संघटनेने कुलगुरु डॉ. फडणवीस यांच्याकडे केली. मात्र, बैठकीचे निमित्त सांगून कुलगुरु विद्यापीठातून निघून गेल्याने सुटा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्र-कुलगुरु डॉ. एस. आय. पाटील यांना घेराव घातला होता. दरम्यान, परीक्षा विभागात कितीही चांगले काम केले तरी कुलगुरु डॉ. फडणवीस यांना मी नकोच असल्याने मला मूळ पदावर रुजू व्हावे लागेल, असे डॉ. कोकरे यांनी सांगितले.

हेही वाचाच...या शहरात दुचाकीस्वाराच्या मागे बसण्याऱ्यांची पंचाईत

दिवसभरातील ठळक घडामोडी...
- महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे सकाळी विद्यापीठासमोर धरणे आंदोलन
- दुपारी 2 वाजता धनगर मंडळाच्या कार्यकर्त्यांची कुलगुरुंसमवेत बैठक
- डॉ. कोकरे यांच्यामुळे विद्यापीठाला आर्थिक भूर्दंड होत असल्याचे कुलगुरुंचे उत्तर
- सायंकाळी 6.30 च्या सुमारास डॉ. कोकरे यांच्या कार्यमुक्‍तीची काढली ऑर्डर
- परीक्षा विभागातील गैरप्रकाराची चौकशी होईपर्यंत डॉ. कोकरे यांना कार्यमुक्‍त न करण्याची मागणी
- सायंकाळी 6 वाजता डॉ. कोकरे यांचे बायोमेट्रिकमधून हटवले नाव
- कुलगुरु विद्यापीठातून निघून गेल्याने प्र-कुलगुरुंना सुटा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा घेराव
- सायंकाळी 6.30 नंतर कुलगुरु राज्यपालांच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना

हेही वाचाच....कर्जमाफी राहणार ऑफलाईनच !


कायदेतज्ज्ञांची समितीद्वारे होणार चौकशी
परीक्षा नियंत्रक या पदाला मान्यता देण्याचा अधिकार विद्यापीठाचा असून विभागीय सहसंचालकांनी वेतन निश्‍चितीस मान्यता देण्यात येत आहे, असे पत्र द्यायला हवे होते. मात्र, डॉ. श्रीकांत कोकरे यांनी त्यासाठीची आवश्‍यक कागदपत्रे मुदतीत न दिल्याने त्यांना कार्यमुक्‍त केल्याचे कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षा विभागातील झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी कायदेतज्ज्ञांची चौकशी नियुक्‍ती केली जाईल. त्यानुसार दोषी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये डॉ. कोकरे यांचा सहभाग नसल्यास त्यांच्यावर विनाकारण कारवाई होणारच नाही, असेही डॉ. फडणवीस म्हणाल्या.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT