murder 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक...फुटबॉलपटूला बेदम मारहाण: डॉक्‍टरांकडून मृत घोषित 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रेल्वे लाईन, कुमार चौक फॉरेस्ट येथील फुटबॉलपटू प्रदीप विजय अलाट (वय-26) या तरुणाचा शुक्रवारी (ता. 27) मारहाणीत मृत्यू झाला आहे. 
काहीजणांनी अचानक प्रदीपला मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने मारहाण करणारांनीच त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मारहाणकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतला. 


प्रदीपच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. प्रदीप हा उच्च शिक्षण घेत असताना काही शाळांमध्ये फुटबॉलचा शिक्षक म्हणूनही काम करीत होता. प्रदीपच्या मृत्यूची माहिती कळताच रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. आरोपीला तत्काळ अटक करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. प्रेम प्रकरणातून प्रदीपला मारहाण झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती. प्रदीप हा निर्व्यसनी होता, तो साधा व सरळ मुलगा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार आरोपींना तत्काळ बेड्या ठोकल्या जातील, असा विश्‍वास पोलिसांनी प्रदीपच्या नातेवाईकांना दिला. 


हेही आवश्‍य वाचाच... 


यात्रेतील ओढा-ओढीच्या कारणावरून मारहाण 
सोलापूर : डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील यात्रेत झालेल्या ओढाओढीचा जाब विचारत आरोपींनी वेळूच्या काठीने व हातापायाने मारहाण केल्याची फिर्याद अमोल बयाजी जावीर यांनी सलगरवस्ती पोलिसांत दिली. फिर्यादी अमोल यांच्या वहिनी सुमन जावीर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कर्णफुले भांडणात गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. ही घटना यल्लम्मा देवीच्या पाणी टाकीजवळ बुधवारी (ता. 25) घडली. फिर्यादीनुसार गणेश विठ्ठल गुळवे, ब्रह्मदेव नागनाथ हेंडगे, आकाश मरगू हाले, गंगाराम तुकाराम जावीर, नवनाथ गंगाराम जावीर (सर्वजण रा. डोगणाव) यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भावाला का बिघडवले म्हणून मारहाण 
सोलापूर : माझ्या भावाला तू का बिघडवले म्हणून चहा पिण्यास आलेल्या फिर्यादीस मारहाण झाल्याची घटना जुना विडी घरकुल येथील सागर चौक परिसरात गुरुवारी (ता. 26) घडली. अब्दुल कादीर नजीर यांनी जैद व मुजो यांच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपींनी दगडाने डोक्‍यात व छातीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार संशयित आरोपींविरुदनध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Bus Fire : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली, नेमकं काय घडलं?

Team India : रोहित शर्मा, विराट कोहली २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा सर्वात मोठा खुलासा; म्हणाला, शुभमन...

Crime News: पैशासाठी रचला स्वतःच्या अपहरणाचा कट;फायनान्स कर्मचाऱ्यासह तिघांवर गंगापूर पोलिसांत गुन्हा नोंद

Shirur Kasar Drought : गावाकडच्या मुक्या जिवांसाठी ‘विठ्ठल’ धावला ; लेकाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून व्यावसायिक देणार १५० टन चारा

जमुई प्रकरण: महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न की राजकीय ध्रुवीकरण?

SCROLL FOR NEXT