पश्चिम महाराष्ट्र

वाहन उचलताना आता होणार शूटिंग 

प्रवीण जाधव

सातारा - नो पार्किंगमध्ये लावलेली वाहने उचलण्यासाठी क्रेनच्या नवीन कराराला पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मान्यता दिली आहे. त्यात वाहन उचलताना लाउडस्पीकरवरून क्रमांक पुकारणे, वाहन मालक लगेच आल्यास त्याच्याकडून दंड स्वीकारणे, कारवाईचे शूटिंग करणे आदी बंधने घालण्यात आली आहेत. नवीन नियमांची अंमलबजावणी करत बुधवारपासून (ता. नऊ) साताऱ्याच्या रस्त्यांवर दोन क्रेन धावणार आहेत. 

वाहनांचे पार्किंग हा वाहतुकीच्या शिस्तीचा महत्त्वाचा भाग आहे. वाहनांचे व्यवस्थित पार्किंग झाले नाही, कोणी कुठेही, कशीही वाहने लावली तर वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सम-विषम पार्किंग व नो पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे पार्किंग करणे कायद्याने अपेक्षित आहे. परंतु, कायदा नुसता कागदावर असून उपयोग होत नाही. 

तो मोडला तर आपल्याला झळ बसू शकते, याची जाणीव होणे आवश्‍यक असते. त्यामुळेच बेशिस्तीने नियम मोडून पार्क केलेली वाहने उचलून नेण्यासाठी "क्रेन'ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर चारचाकी वाहनांना "जामर' लावले जातात. या दंडात्मक कारवाईमुळे वाहनधारकांना शिस्त लागते. मात्र, या कारवाया करणाऱ्या "क्रेन'चा पोलिस दलाशी असलेला करार एक महिन्यापूर्वी संपला. त्यामुळे सातारकरांना मोकळे रान मिळाले. 

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एक तर शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुख्य रस्ते रहदारीसाठी बंद असल्यामुळे अंतर्गत छोट्या रस्त्यांवरून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यातच क्रेन नसल्यामुळे वाहने पार्किंगची संपूर्ण शिस्तच बिघडून गेली आहे. कोणीही कुठेही बिनधास्तपणे वाहने लावतात. त्यामुळे आधीच छोट्या रस्त्यांवर दुतर्फा वाहने लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. याबाबत "सकाळ'ने वृत्तही प्रसिद्ध केले होते. दरम्यानच्या काळात वाहतूक शाखेने दोन क्रेनसाठी प्रस्ताव मागविला. मात्र, पूर्वीप्रमाणेच प्रस्ताव करण्याऐवजी पुण्यासारख्या शहरांमध्ये कशा प्रकारे प्रस्ताव केले जातात, याची माहिती घेत पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नागरिकांच्या अधिक सोयीचा प्रस्ताव तयार करण्यावर भर दिला. त्यानुसार नव्या नियमांनुसार क्रेनच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये नागरिकांच्या सोयीच्या तरतुदी आहेत. 

वाहनांवर कारवाई करताना... 
क्रेनवरील सर्व कामगारांना युनिफॉर्म सक्तीचा 
वाहन उचलताना शूटिंग करणे बंधनकारक 
कारवाई करताना वाहन क्रमांक पुकारावा लागणार 
वाहन उचलताना जागेवर दंड भरणे शक्‍य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT