in the.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शाळू ज्वारीची आगारातच टंचाई 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः यंदा शाळूच्या हंगामातही उत्पादनात मोठी घट आल्यामुळे भाकरीला यंदा चांगलाच भाव आला आहे. चपाती, पोळीचा तोरा मात्र उतरला आहे. जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज मध्य-पूर्व भागासह शेजारील सांगोला, मंगळवेडा शाळू आगारातही उत्पादन घटल्याने दरातील तेजी कायम आहे. सांगलीतील बाजारात 40 ते 45 रुपये किलो दराने शाळूची विक्री सुरु आहे. त्यातही जिरायती शाळू त्यापेक्षा दोन-चार रुपयांनी महागडा आहे. सांगली जिल्ह्यात गव्हाचे विक्री योग्य उत्पादन घेतले जात नसतानाही शंभर किलोचा दर 2200 ते 2700 रुपयांदरम्यान स्थिर आहे. शाळू, बाजरीच्या तुलनेत गहू फारच स्वस्त आहे. 

गेल्यावर्षी अतिवृष्टी, त्यानंतर झालेल्या पेरा, पिकांना पुरेशा प्रमाणात उष्णता मिळू न शकल्याने पुरेसी वाढ होवू शकली नाही. जुलै व ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये जमिनीतील कस वाहून गेल्याचाही परिणाम जाणवला. सांगली जिल्ह्यच्या पूर्व भागात दोन वर्षापुर्वी जिरायत क्षेत्रात 8 ते 10 पोत्यांचा उतारा यंदा केवळ एक ते दीड पोत्यापर्यंत घरसला. काही अतिवृष्टीच्या भागात पाच एकरात 25 ते 28 पोत्यांच्या उतारा अपेक्षीत असताना केवळ 5 ते 6 पोत्यांवर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले. परिणामी सुगीच्या मार्चच्या पंधरवड्यापासूनच हंगामापासून यंदा दरात तेजी पहायला मिळाली. 

गरिबांच्या घरातील प्रमुख अन्न असलेली भाकरी महागली आहे. 
सांगली जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन नसतानाही सध्या शंभर किलोचा दर 2200 ते 2700 रुपये आहे. विशेष म्हणजे रेशन दुकानातून गहू मोठ्या प्रमाणावर मिळतो यामुळेही गहू स्वस्त उपलब्ध आहे. यामुळे लोकांचा आढ पोळ्यांवरच जास्त आहे. शाळू उपलब्धता कमी असल्यामुळे बाजरी प्रतिकिलो 30 ते 32 आणि पूर्व भागात मक्का 15 ते 19 रुपये किलोंनी मिळतो. त्याचा वापर खाद्यामध्ये सुरु झालेला आहे. 

""शाळूच्या आगारात गेल्या वर्षी प्रारंभी पाऊस झाला. मात्र, पिक ऐन जोमात असताना पाण्याची कमतरता भासली. परिणामी उत्पादनात मोठ्या घट झाली. यामुळे यंदा ज्वारीच्या दरात तेजी कायम आहे.'' 

-गणेश पवार, मंगळवेढा (जि. सोलापूर). 

 

 

""यंदा शाळू पिकांच्या मळणीवेळीच उतारा कमी मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. पाच एकरातील पिकांच्या उतारा 25 ते 28 क्विंटलवरुन केवळ 5 ते 7 क्विंटलवर पोहोचला आहे. परिणामी दरात तेजी कायम आहे.'' 
-श्रीधर पाटील, कांचनपूर. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT