पश्चिम महाराष्ट्र

मर्दानी आखाड्याचा लौकिक पाडळी खुर्द ते पानिपत व्हाया दिल्ली!

संदीप खांडेकर

कोल्हापूर - ग्रामीण व शहरी पद्धतीच्या मर्दानी खेळाचे धडे गिरवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील श्रीमंत योगी मर्दानी आखाड्याने आपला लौकिक सर्वदूर पोचवला आहे. सहा वर्षांत या आखाड्याने केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे, तर पानिपत व दिल्ली येथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. वस्ताद भिकाजी पाटील, महिपती पाटील यांच्याकडून मर्दानी खेळाचा वारसा प्रशिक्षक योगेश गुंजीकर यांनी जोपासला असून, ठिकठिकाणी प्रात्यक्षिकांद्वारे मर्दानी खेळाचा प्रसार करण्याचा विडा उचलला आहे.
मर्दानी खेळाचे वस्ताद गणपती पाटील यांच्याकडून भिकाजी पाटील, महिपती पाटील यांनी 

मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले होते. या दोघांनी या कलेचा वारसा पुढे चालवला असला तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात गावातून ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर होती. गुंजीकर याने या दोघांकडून ही कला आत्मसात केली. प्राचीन युद्धकला विशारद आनंदराव पोवार मर्दानी खेळाच्या आखाड्याचे पंडितराव पोवार यांच्याकडून शहरी पद्धतीच्या मर्दानी खेळाचे धडे घेतले. त्यानंतर पाडळी खुर्दमध्ये २०१३ ला आखाडा सुरू केला.

काठी, पट्टा, भाला, तलवार, फरी गदका, पट्टा लढत, विटा फेक, लिंबू काढणी, डोळे बांधून लिंबू काढणी, हनुवटी खाली व टाचे खालील लिंबू काढणी, मानेवरील पोटावरील ओठांवरील काकडी पट्ट्याच्या साह्याने कापणे, डोक्‍यावरील हातावरील नारळ काठीच्या साह्याने फोडणे अशा विविध प्रकारांत गावातील मुले-मुली तरबेज झाली. पानिपत, सूरज कुंड मेला दिल्ली, ओडिशा, गोकाक, बेळगाव, पुणे, मुंबईत मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली.

आखाड्यातील हर्ष पाटील, पंकज पोवार, पृथ्वीराज पाटील, निखिल माने, प्रतीक पाटील, सिद्धेश पाटील, प्रथमेश पाटील, इब्राईम पटेल, संस्कार पाटील, रितेश माळी, अस्मिता भोसले, सानिका माने, मधुरा माळी, ज्ञानेश्वरी पाटील, सानिका भोसले, शिवानी पाटील हे ज्या ठिकाणी प्रात्यक्षिके सादर करतील तेथे प्रेक्षकांची हमखास दाद घेतात.

सलग दोन वेळा विजेतेपदाचा मान
शिरटी (ता. शिरोळ) येथे झालेल्या मर्दानी खेळाच्या स्पर्धेत प्रथम, तर आडी कर्नाटक येथे झालेल्या स्पर्धेत सलग दोन वेळा विजेतेपदाचा मान मिळवला. इचलकरंजीत २०१८ ला झालेल्या राज्यस्तरीय मर्दानी खेळाच्या स्पर्धेत या आखाड्याने तृतीय क्रमांक पटकावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT