पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 :निवडणुकीच्या प्रचारासाठी गाणाऱ्या गायकांना 'अच्छे दिन'

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारक व नेते व्यासपीठावर येई पर्यंत लोकाची उपस्थिती मंडपात टिकावी म्हणून सोशलमिडीयाच्या जमान्यात ही निवडणूक प्रचारासाठी गाणी सादर केली जात असून, ही गाणी सादर करण्याऱ्या गायकाला या निवडणूकीत अच्छे दिन आले आहेत. वेगवेगळ्या संगीतमय गाण्यामुळे लोकांची करमणूक होत असून, सत्ताधारी पक्षाची चुकीचे कामे मतदाराला पटवून दिली जात आहेत. तर सत्ताधारी पक्षाकडून समाचार गाण्यातून घेतला जात आहे.

सध्याच्या काळातील तरूणाई ही सोशलमिडीयाच्या आहारी गेल्यामुळे सातत्याने मोबाईलच्या संपर्कात वावरत आहे अशा परिस्थितीत या तरूणांना फेसबुक व व्हाटसअपच्या माध्यमातून सांगावे लागत असल्याची जाणीव सर्वच राजकीय पक्षाला झाली असून सध्या प्रचारही हायटेक झाला तरूण मतदार मोबाईलच्या संपर्कात गेल्यामुळे याच्या माध्यमातूनच पक्षाची ध्येयधोरणे देखील याची माहिती मोबाईलच्या माध्यमातून सांगितली जात असताना प्रसंग राजकीय विडंबन वात्रटिकेला सोशलमिडीयात प्रतिसाद मिळत असताना ही सांस्कृतिक कला सादर करणाय्रा कलाकारांनी इंदीरा गांधी पासून ते आज तागायत काॅग्रेस पक्षांनी कोण कोणत्या योजना राबवल्याची  माहिती व नोटा बंदी ,फसलेली कर्जमाफी,बेरोजगारी,15 लाख खात्यावर जमा होण्याची घोषणा याबाबतची माहिती गाण्यातून लोकांना पटवून दिली सध्या काळात गाजलेल्या गाण्यांच्या धर्तीवर ही गाणी सादर केली जात असून तालुक्यातील डोंगरगाव येथील शाहीर बाबासाहेब साखरे यांनी ढोलकीच्या तालावर स्वरचीत गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या गाण्यामुळे तालुक्यातील सभेसाठी आलेले नागरिक मन लावून ऐकून घेत आहे.यामुळे यातील कलाकाराना फक्त थोडेच दिवस संधी मिळणार असल्याने यंदाच्या दुष्काळात चार रू उत्पन्न मिळणार आहे.पण या गाण्यातून मतात रूपांतर करण्याच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात केलेले प्रबोधन मतदाराच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरतात की नाही निकालानंतर समजणार आहे.

कलाकार हा स्वतंत्र विचारांचा असतो त्याच्या कलेचा प्रचारासाठी आणी कोडकौतुकासाठी वापर सर्वच पक्षाकडून केला जातो प्रसंगी पोटासाठी करावे दागत असले तरी नंतर मात्र त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते..
- शाहीर बाबासाहेब साखरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT