corona 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात 14 दिवसांत साडेसहा हजार कोरोनामुक्त 

अजित झळके

सांगली ः जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी "बेड अडवून ठेवलेल्या' रुग्णांना रुग्णालयातून थेट घरी पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानंतर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा जिल्ह्यातील टक्का वाढला आणि घरी राहून उपचार घेत लोक बरे झाले. गेल्या 14 दिवसांत 6 हजार 449 लोक कोरोनामुक्त झाले. तुलनेत कोरोना बाधितांचा आकडा दुप्पट वेगाने वाढला आहे. त्यामुळे बेडची समस्या कायम असली तरी त्यावर "होम आयसोलेशन'चा तोडगा याघडीला तरी काहीअंशी उपयुक्त ठरताना दिसतोय. 


ऑक्‍सिजनचा तुटवडा, व्हेंटिलेटरची अत्यंत कमी संख्या या प्रश्‍नांना भिडत जिल्ह्यात कोरोनाशी लढा सुरु आहे. कोविड केअर सेंटरची संख्या वाढवून काही बेड उपलब्ध करून दिले जात आहेत, मात्र अत्यवस्थ रुग्णांवर वेळेत उपचार सुरु होण्यात अडचणी आहेत. त्यातून मृत्यू दर वाढलाय, हेही नाकारून चालणार नाही. या स्थितीत कोरोनामुक्तीचा वेग वाढणे ही सकारात्मक बाजू म्हणावी लागेल. जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, 31 ऑगस्ट रोजी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 356 इतकी होती. आता 14 सप्टेंबर रोजी 13 हजार 805 इतकी झाली आहे. म्हणजेच, या 14 दिवसांत 6 हजार 449 लोक बरे झाले आहेत. त्यातील सुमारे 60 टक्के लोक हे रुग्णालयात उपचार घेत होते. ते बरे झाले आणि अत्यवस्थ रुग्णांसाठी बेड उपलब्ध झाला, ही मोठी बाब आहे. 


दुसरीकडे कोरोना बाधित होण्याची संख्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. 31 ऑगस्ट रोजी 12 हजार 394 इतकी बाधितांची संख्या होती. ती प्रचंड वेगाने वाढून 14 सप्टेंबर रोजी 24 हजार 39 इतकी झाली आहे. या काळात नव्याने 11 हजार 645 लोक बाधित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बेड उपलब्ध होण्याची समस्या कायम आहे. विशेषतः ऑक्‍सिजन बेडच्या उपलब्धतेसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट सुरु आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT