bird.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सहा वर्षांनंतर सोलापुरात दिसला निळ्या डोक्‍याचा कस्तूर 

परशुराम कोकणे

सोलापूर : तब्बल सहा वर्षांनंतर सोलापुरात बाळे परिसरात निळ्या डोक्‍याचा कस्तूर हा पक्षी दिसून आला आहे. 

ऑक्‍टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक पक्षी स्थलांतर दिवशी निळ्या डोक्‍याचा कस्तूर दिसल्याने आनंद व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी नेचर कॉंझर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश क्षीरसागर हे बाळे परिसरात फेरफटका घालत होते. त्यांना एक वेगळाच पक्षी दिसला. त्यांनी त्या पक्ष्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून पक्षी अभ्यासक भरत छेडा यांना व्हॉट्‌सऍपद्वारे पाठविले. तो पक्षी निळ्या डोक्‍याचा कस्तूर असून तो दुर्मिळ असल्याचे श्री. छेडा यांनी कळविले. 

निळ्या डोक्‍याच्या कस्तूर हा पक्षी सहा वर्षांपूर्वी डॉ. अविनाश राऊत यांनी पाहिला होता. त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात फोटोही काढले होते. तब्बल सहा वर्षांनी या पक्ष्याचे दर्शन सोलापुरात झाले आहे. संतोष धाकपाडे यांनी आपल्या कॅमेऱ्यात या पक्ष्याचे फोटो टिपले आहेत. 

सकाळी, सायंकाळी गातात पक्षी.. 
मसिकॅपिडी पक्षिकुलाच्या टर्डिनी उपकुलातील पक्ष्यांना सामान्यत: कस्तूर म्हणतात. हे पक्षी जगभर आढळत असले तरी युरोप व आशियाच्या समशितोष्ण व उपोष्ण प्रदेशात ते प्रामुख्याने आढळतात. भारतातही सर्व ठिकाणी हे पक्षी दिसून येतात. काही जाती उत्तर अमेरिकेत राहतात. या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य फळे, कीटक, कृमी आणि गोगलगाय आहे. हे गाणारे पक्षी असून सकाळ, सायंकाळी गातात. घरटे बांधणे व अंडी उबविणे ही कामे मादी करते. नर व मादी दोघेही पिल्लांना भरवितात. घरटे वाटीसारखे किंवा सपाट असून चिखलात मुळ्या, शेवाळ, गवत वगैरे मिसळून त्यांचे बनविलेले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT